ग्रामसेवक शिवदे निलंबित

By Admin | Updated: January 22, 2017 02:59 IST2017-01-22T02:59:24+5:302017-01-22T02:59:24+5:30

शेततळय़ांची कामे जेसीबी मशीनने करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई.

Gramsevak Shiva suspended | ग्रामसेवक शिवदे निलंबित

ग्रामसेवक शिवदे निलंबित

मोताळा, दि. २१- पिंपळगाव नाथ येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक व्ही.एम. शिवदे यांनी रोजगार हमी योजनेंतर्गत असलेल्या शेततळय़ांची कामे जेसीबी मशीनने करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांनी त्यांना निलंबित केले आहे. पिंपळगाव नाथ येथे ग्रामसेवक पदावर कार्यरत असताना शिवदे यांनी मग्रारोहयो अंतर्गत शेततळय़ाचे काम जेसीबी मशीनद्वारे केले व त्याची मजुरी मस्टरद्वारे अदा करून चौकशीसाठी कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली. या प्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले.

Web Title: Gramsevak Shiva suspended