ग्रामीण रुग्णालयाच्या कामचुकार कर्मचार्यांना समज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:18 IST2017-09-30T00:18:05+5:302017-09-30T00:18:15+5:30
देऊळगावमही: येथील ग्रामीण रुग्णालयात विविध समस्या निर्माण झाल्या असून, रुग्णांना सेवा मिळत नाही. रुग्णालयातील कर्मचार्यांच्या दुर्लक्षतेमुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. याबाबत लोकमतमध्ये २६ सप्टेंबर रोजी वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत वैद्यकीय अधीक्षक डॉ.जे.पी. ताठे यांनी कामचुकार कर्मचार्यांना समज देऊन रुग्णांना चांगली सेवा देण्याचे सांगितले.

ग्रामीण रुग्णालयाच्या कामचुकार कर्मचार्यांना समज!
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगावमही: येथील ग्रामीण रुग्णालयात विविध समस्या निर्माण झाल्या असून, रुग्णांना सेवा मिळत नाही. रुग्णालयातील कर्मचार्यांच्या दुर्लक्षतेमुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. याबाबत लोकमतमध्ये २६ सप्टेंबर रोजी वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत वैद्यकीय अधीक्षक डॉ.जे.पी. ताठे यांनी कामचुकार कर्मचार्यांना समज देऊन रुग्णांना चांगली सेवा देण्याचे सांगितले.
देऊळगावमही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना विविध तपासण्यांसाठी शहराच्या ठिकाणी किंवा खासगी डॉक्टरकडे पाठविण्यात येते; मात्र रुग्णालयातच लाखो रुपयांचे यंत्र बंद खोलीत धूळ खात पडले असल्याचे लोकमतने सोमवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान निदर्शनास आले होते. देऊळगाव राजा तालुक्यातील सर्वात मोठे समजले जाणारे ३0 खाटांचे शासकीय ग्रामीण रुग्णालय सद्यस्थितीत स्वच्छतेअभावी सलाइनवर असून, कामचुकार कर्मचार्यांच्या मनमानी कारभारामुळे रुग्णालयात घाणीचे साम्राज्य पसरले असून, परिसरात मोठय़ा प्रमाणात दुर्गंधी येत आहे. याबाबत लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत वैद्यकीय अधीक्षक डॉ. ताठे यांनी संबंधित कामचुकार कर्मचार्यांची कानउघडणी करून रुग्णांना चांगली सेवा देण्याचे सांगितले.