विविध विषयांवर गाजली जांभाेराची ग्रामसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:39 IST2021-09-12T04:39:40+5:302021-09-12T04:39:40+5:30
सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच कोंडिबा खरात होते. ग्रामसभेच्या सुरुवातीला माजी सरपंच व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रमेशराव जनार्दन खरात यांची ...

विविध विषयांवर गाजली जांभाेराची ग्रामसभा
सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच कोंडिबा खरात होते. ग्रामसभेच्या सुरुवातीला माजी सरपंच व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रमेशराव जनार्दन खरात यांची खरेदी-विक्री संस्था सिंदखेडराजाच्या मुख्य प्रशासकपदी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा व श्री शिवाजी हायस्कूलचे शिक्षक बी.डी.खरात व सरपंच कोंडिबा खरात यांनी सत्कार केला. तसेच याच ग्रामसभेत गावातील प्रतिष्ठित नागरिक परशुराम खरात(महाराज) आणि मधुकर राठोड यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर ग्रामसभेला सुरुवात करण्यात आली. तर प्रथम ग्रामपंचायतीचे सचिव मेहेत्रे यांनी ग्रामसभेमधील मुद्दे वाचून दाखविले. त्यानंतर ग्रामसभेत गदारोळ झाल्याने ग्रामसभा तहकूब करण्यात आली असून, १७ सप्टेंबर रोजी पुन्हा ग्रामसभा घेण्यात येईल असे सरपंच कोंडिबा खरात यांनी ग्रामस्थांना सांगितले आहे. या ग्रामसभेला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर ग्रामसभेला तलाठी कटारे, पोलीस पाटील जितेंद्र जैवळ, मुख्याध्यापक राम जैवळ, ग्रामपंचायतीचे सचिव मेहेत्रे, सदस्य प्रकाशराव खरात, संदीप खरात, आकाश तौर, सर्व ग्रामपंचायतीचे कर्मचारी व सदस्य हजर होते.