पाडळी शिंदे येथील ग्रामपंचायत अविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:23 IST2021-01-01T04:23:42+5:302021-01-01T04:23:42+5:30

तहसील कार्यालय देऊळगाव राजा येथे अर्ज छाननी झाली असून, पाडळी शिंदे ग्रामपंचायतच्या एकूण तीन प्रभागातील एकूण नऊ जागासाठी नऊ ...

Gram Panchayat Avirodh at Padli Shinde | पाडळी शिंदे येथील ग्रामपंचायत अविरोध

पाडळी शिंदे येथील ग्रामपंचायत अविरोध

तहसील कार्यालय देऊळगाव राजा येथे अर्ज छाननी झाली असून, पाडळी शिंदे ग्रामपंचायतच्या एकूण तीन प्रभागातील एकूण नऊ जागासाठी नऊ उमेदवारी अर्ज आले होते. त्यामुळे पाडळी शिंदे येथील ग्रामपंचायत पहिल्यांदा बिनविरोध झाली आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक एकमधून रवींद्र भीमराव शिंदे, सुनील प्रल्हाद देशमुख, विद्या श्रीकृष्ण शिंदे, प्रभाग दोनमधून संगीता राजू ठेंग, सविता रामेश्वर शिंदे, संजय दामोधर शिंदे, तर प्रभाग तीनमधून कमल अरुण जाधव, मदन महादु जाधव, उषा प्रकाश शिंदे असे नऊ सदस्य तीन प्रभागामधून अविरोध झाले आहेत. ग्रामपंचायत आविरोध झाल्यामुळे गावाला निधीची अपेक्षा आहे. त्यामुळे आता किती निधी मिळणार, याकडे पाडळी शिंदेवासीयांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, तांत्रिकदृष्ट्या ही ग्रामपंचायत अविरोध झाली असली तरी त्याची अधिकृत घोषणा पुढील काळात होईल.

Web Title: Gram Panchayat Avirodh at Padli Shinde