धान्य साठवण्यासाठी लागणारी कणगी झाली इतिहास जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:33 IST2021-04-25T04:33:43+5:302021-04-25T04:33:43+5:30
अशोक इंगळे / साखरखेर्डा : पूर्वी धान्य उंदिरापासून किड्यापासून बचाव करण्यासाठी काही कणगी बनवणाऱ्या कारागिरांकडून कणगी बनवून ...

धान्य साठवण्यासाठी लागणारी कणगी झाली इतिहास जमा
अशोक इंगळे / साखरखेर्डा : पूर्वी धान्य उंदिरापासून किड्यापासून बचाव करण्यासाठी काही कणगी बनवणाऱ्या कारागिरांकडून कणगी बनवून घेतली जात असे . त्यामध्ये धान्य साठवून ठेवत असत़ गत काही वर्षांपासून या कणग्या नामशेष झाल्या असून त्यांची जागा आता पत्र्याच्या काेठीने घेतली आहे़
सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील बहुतांशी कारागीर कणग्या बनवत . शिंदी येथील विलास तोडे यांचे वडील आत्माराम तोडे सुद्धा आकर्षित कणग्या बनवत असत . सकाळीच रानावनात जाऊन ते कोराटी यांचे सरळ फोक तोडून आणून ज्यांनी कणग्या बनवण्याची ऑर्डर दिली त्यांच्या ते कणग्या बनवत असत .
दहा क्विंटल धान्य, दोन क्विंटलचे धान्य, पाच क्विंटलचे धान्य अशा प्रकारचे धान्य ज्यांच्याकडे असेल ते त्या प्रकारच्या कणग्या धान्य साठवण्यासाठी बनवून घेत .त्यामुळे आकर्षक अशा निरगुडी (कोराटी )च्या फोकापासून कनग्या बनविल्या जात असे .एकमेकांमध्ये फोक विनवून कणग्या बनल्यानंतर त्या सुकण्यासाठी उन्हात ठेवल्या जात .
धान्य काढण्यासाठी चौकोनी छोटीशी जागा ठेवून त्या चौकोनी छिद्रामध्ये घरातील कापडाचा बोळा त्यामध्ये घालत. जेव्हा धान्य काढायचे असेल त्यावेळेस तो कापडाचा बोळा काढले जाई व धान्य काढल्यानंतर परत तो गोळा त्या छिद्रामध्ये घालून बंद करता येत होते . कणगी बनल्यानंतर त्याला गोठ्यामधून शेन आणून कणगीला लिपून घेत . कणगी ही पाच फुटापासून तर दहा फुटापर्यंत असायची . धान्य सडू नये म्हणून जुन्या काळी कडुलिंबाचा पाला त्यामध्ये टाकल्या जायचा . धान्य साठवण्यासाठी कणग्या ऐवजी आता लोखंडी पत्र्यापासून कोठी बनवले जात आहे .