ग्रा.पं.भवनाचे काम निकृष्ट!

By Admin | Updated: December 5, 2015 09:08 IST2015-12-05T09:08:59+5:302015-12-05T09:08:59+5:30

चिखली तालुक्यातील भोरसा-भोरसी ग्रामपंचायत भवनाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार.

G.P.Bhavna's work is inferior! | ग्रा.पं.भवनाचे काम निकृष्ट!

ग्रा.पं.भवनाचे काम निकृष्ट!

चिखली : तालुक्यातील भोरसा-भोरसी येथे गत वर्षभरापासून सुरू असलेल्या ग्रामपंचायत भवनाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार ग्रा.पं.सदस्य गोपाल ढोरे यांनी केली असून, या कामाची गुणवत्ता तपासून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. मूलभूत सुविधा फंडातून १0 लक्ष रुपये किमतीचे ग्रामपंचायत भवन तालुक्यातील भोरसा-भोरसी येथे उभारण्या त येत आहे. या ग्रा.पं.भवनाच्या बांधकामाचे कंत्राट घेणार्‍या कंत्राटदाराने बांधकामात अत्यंत कमी प्रमाणात सिमेंट वापरले असून, माती मिङ्म्रीत रेतीचा वापर केल्याने बांधकाम पूर्ण होण्याआधीच ठिकठिकाणी खचत आहे, तसेच भिंतींना अनेक ठिकाणी तडेसुद्धा गेले असून, याबाबत संबंधित ठेकेदारास वारंवार बजावूनसुद्धा हे तुपुरस्सर ग्रा.पं.पदाधिकार्‍यांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करून ठेकेदाराने मनमानी पद्धतीने व अत्यंत सुमार दर्जाचे बांधकाम चालविले असल्याचा आरोप गोपाल ढोरे व ग्रामस्थांनी केला असून, या कामाच्या गुणवत्तेची तातडीने तपासणी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आमरण उपोषणास बसण्याचा इशारा पं.स.गटविकास अधिकार्‍यांना दिलेल्या तक्रारीद्वारे दिला आहे. या निवेदनावर गोढे यांच्यासह माजी सरपंच रमेश आकाळ, परमेश्‍वर भुसारी, संतोष आकाळ, अनमोल ढोरे, संदीप ढोरे, संजय पवार, अनंता मोतेकर, रामेश्‍वर शिंगणे, संजय आकाळ, विष्णू भुसारी, नारायण आकाळ, विजय मुरकुटे, प्रताप गवई, दशरथ ढोरे, रामेश्‍वर भुसारी, शुभम भुसारी, मंगेश भुसारी, साहेबराव मुरकुटे आदींसह सुमारे ३0 ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍या आहेत. जीवन प्राधिकरण कर्मचार्‍यांचे रजा आंदोलन बुलडाणा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे व अधिकारी व कर्मचार्‍यांचे वेतन, भत्ते व नवृत्ती वेतन शासनाच्यावतीने अदा करण्यात यावे, या मागण्यांसाठी ४ डिसेंबर रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी काळय़ा फिती लावून एक दिवशीय सामूहिक रजा आंदोलन केले. या आंदोलनामुळे बुलडाणा, चिखली, खामगाव व जळगाव जामोद येथील कार्यालयात एकच शुकशुकाट पसरला आहे. सामूहिक रजा आंदोलन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता व्ही.एम. सरकटे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या आंदोलनात बुलडाणा विभागासह चिखली, खामगाव व जळगाव जामोद उपविभागातील कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी कर्मचार्‍यांच्या वतीने जिल्हािधकार्‍यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. त्यामध्ये नमूद केले की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून जात आहे. या विभागाकडे कामाचा व्याप कमी झाल्याने उत्पन्नाचा स्त्रोतदेखील कमी झाला आहे. परिणामी, आज जीवन प्राधिकरणाजवळ कर्मचार्‍यांना मासिक वेतन देण्यासाठीसुद्धा निधी नाही. त्यामुळे भविष्यात कर्मचार्‍यांना वेतन व भत्ते मिळणे अशक्यप्राय होणार आहे. जीवन प्राधिकरणाला शासकीय सेवेत समाविष्ट करण्यासाठी अनेक संघटनांनी आजपयर्ंत आंदोलने केली; परंतु त्या आंदोलनाची शासनाने कुठलीच दखल घेतली नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांची हेळसांड थांबवावी, या विभागाला शासकीय सेवेत सामावून घेत अधिकारी व कर्मचार्‍यांचे वेतन, भत्ते व नवृत्ती वेतन शासनाच्यावतीने अदा करण्यात यावे, या मागणीसाठी अधिकारी व कर्मचार्‍यांनी काळय़ा फिती लावून एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन केले.

Web Title: G.P.Bhavna's work is inferior!