सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे - आकाश फुंडकर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 15:37 IST2020-03-04T15:36:43+5:302020-03-04T15:37:39+5:30

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवित नुकसानाचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी आमदार आकाश कुंडकर यांनी केली.

The government has ridiculed the farmers - Akash Pundkar |  सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे - आकाश फुंडकर  

 सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे - आकाश फुंडकर  

लोकमत न्यूज नेटवर्क 
खामगाव : बुलडाणा जिल्हयातील शेतकºयांच्या विविध प्रश्नांबाबत आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी ३ मार्चरोजी अर्थ संकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला. 
जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपिट झाली, त्यात शेकडो हेक्टरवर हरभरा, गहु, कांदयाचे नुकसान झाले. शासनाकडून कोणत्याही प्रकारचे पंचनामे करण्याचे आदेश अद्याप देण्यात आले नाही. याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवित नुकसानाचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी आमदार आकाश कुंडकर यांनी केली. विधानसभेत २९३ च्या प्रस्तावावेळी बोलतांना ते म्हणाले की, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला हा प्रस्ताव शेतकºयांचे वास्तव मांडणारा आहे. या प्रस्तावात त्यांनी कोण्या पक्षावर आरोप केले नव्हते आणि आपण जर पाहिले तर मागच्या पाच-सहा महिन्यांमध्ये नैसगिक आपत्तीमुळे शेतकन्यांचे नुकसान होत आहे. यातून शेतकºयांची सुटका करणे आवश्यक असून शेतकन्यांना काय पायाभूत गरजा पुरवता येतील याचा विचार करण्याची गरज आहे. आमच्या सरकारने अवकाळी पाऊस किंवा इतर आपात परिस्थितीत तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते व शेतकन्यांना योग्य मदत देऊन आधार दिला होता. परंतु हे बिघाडी सरकार मागील सरकारवर आरोप करण्यात धन्यता मानत आहे. सातबारा कोरा, सरसकट कर्जमाफी अशा शेतकन्यांना दिलेल्या आश्वासनांबद्दल काय उपाययोजना केल्या याबाबत काहीही बोलले जात नाही. शेतकºयांच्या कापसाची जी अवस्था आहे तिच तुरीचीही अवस्था आहे आणि जर अशीच परिस्थिती कायम राहिल्यास शेतकरी कधीच चांगल्या अवस्थेत येणार नाही. शासन शेतकºयांना जी मदत देते ती मदत बँकांचे अधिकारी कर्ज खात्यामध्ये जमा करतात, शेतकन्यांच्या हातात एक रुपयाने सुद्धा मिळत नाही. त्यामुळे शेतकन्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभेराहायचे असेल तरखंबीर निर्णय घ्यावे लागणार आहेत. बºयाच ठिकाणी विद्यत ट्रान्सफॉर्मर उपलब्ध नाहीत तर काही ठिकाणी आॅइल अभावी ट्रान्सफार्मर बंद आहेत. ही समस्या कायमची निकाली काढायची असल्यास प्रत्येक जिल्ह्यासाठी ट्रांसफार्मर बँक असायला अशी आग्रही मागणीही केली.

Web Title: The government has ridiculed the farmers - Akash Pundkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.