जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:33 IST2021-03-06T04:33:10+5:302021-03-06T04:33:10+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात चालू हंगाम २०२०-२१ मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेडच्या वतीने हरभरा खरेदी हमीदर ५,१०० रुपये ...

Government gram procurement started in the district | जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदी सुरू

जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदी सुरू

बुलडाणा : जिल्ह्यात चालू हंगाम २०२०-२१ मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेडच्या वतीने हरभरा खरेदी हमीदर ५,१०० रुपये प्रती क्विंटलप्रमाणे खरेदी करणे सुरू झाले आहे. हरभरा खरेदीसाठी जिल्ह्यात १० खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यांतर्गत बुलडाणा तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित, देऊळगांवराजा तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित, लोणार तालुका शेतकी सहकारी खरेदी-विक्री समिती मर्यादित, मेहकर तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित, शेगांव तालुका शेतकी सहकारी खरेदी-विक्री समिती मर्यादीत, संग्रामपूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री समिती मर्यादित, संत गजानन कृषी विकास शेतकी उत्पादन कंपनी मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी सुलतानपूर केंद्र साखरखेर्डा ता.सिं.राजा, मॉ जिजाऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी सिंदखेडराजा, स्वराज्य शेतीपूरक सहकारी संस्था चिखली केंद्र उंद्री ता.चिखली, अशी १० खरेदी केंद्रांना हरभरा खरेदीकरिता मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यात हरभरा खरेदी करण्याकरिता हेक्टरी उत्पादकता १५.८२ क्विंटल देण्यात आली आहे, तरी शेतकऱ्यांनी हमीभावाचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा, यासाठी उपरोक्त संस्थांकडे नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी.एस. शिंगणे यांनी केले आहे.

Web Title: Government gram procurement started in the district