शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला भाऊसाहेबांच्या कार्याचा विसर -  राधाकृष्ण विखे पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 13:48 IST

खामगाव : राज्याचे दिवंगत कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना शेतकºयांच्या समस्यांची जाण होती. मात्र या सरकारने त्यांना कधी शेतकºयांपुढे येवू दिले नाही. पदोपदी भाऊसाहेबांचा अपमान करण्याचे काम सरकारने केले असल्याची टिका विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 

 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : राज्याचे दिवंगत कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना शेतकºयांच्या समस्यांची जाण होती. मात्र या सरकारने त्यांना कधी शेतकºयांपुढे येवू दिले नाही. पदोपदी भाऊसाहेबांचा अपमान करण्याचे काम सरकारने केले असल्याची टिका विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यभर काढण्यात येत असलेली जनसंघर्ष यात्रा  खामगावात ८ डिसेंबररोजी संध्याकाळी ७ वाजता पोहचली. यानिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजीत जाहिर सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाला महाराष्ट्राचे  सहप्रभारी तथा अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, महाराष्ट प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार नाना पटोले, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव तथा आमदार हर्षवर्धन सपकाळ,  प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम उमाळकर,  बुलडाणा जिल्हा प्रभारी मदन भरगड,  जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार राहुलभाऊ बोंद्रे,  खामगावचे माजी आमदार दिलिपकुमार सानंदा, विजय अंभोरे, आमदार यशोमती ठाकूर, खामगाव माजी नगराध्यक्ष अशोक सानंदा, साजीदखान पठाण, बाळापूरचे माजी आमदार खतीब, औरंगाबादचे आमदार सत्तार, अतूल लोंढे, आशिष जैन यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक खामगावचे माजी आमदार दिलिपकुमार सानंदा यांनी केले. यावेळी पुढे बोलतांना विखे पाटील यांनी जिल्हयासह राज्यातील विविध समस्यांवर प्रकाश टाकला. शेतकरी, सर्वसामान्य जनता हवालदिल झाली असताना सरकारला मात्र त्याचे काहीही सोयरसुतक राहिलेले दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकºयाने कांद्याची मनीआॅर्डर पाठवूनही दु:ख कळले नाही. उलट त्यांनी शेतकरी कोणत्या पक्षाचा आहे याची चौकशी सुरु केली. सरकारने आता देवांनाही सोडले नाही अशीही टिका त्यांनी केली. अच्छे दिनचे स्वप्न दाखवून देशवासियांची दिशाभूल करणाºया सरकारला धडा शिकवण्यासाठी आता जनतेचे सज्ज राहावे. २०१९ च्या निवडणूकीत भाजपाला जागा दाखवण्याचे आवाहनही विखे पाटील यांनी केले. तत्पूर्वी नाना पटोले, आमदार सत्तार, आशिष जैन, यशोमती ठाकूर, हर्षवर्धन सपकाळ  यांनीही भाषणातून भाजपाचा विविध उदाहरणे देत समाचार घेतला. आभार प्रदर्शन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहूल बोंद्रे यांनी केले. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावCongress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्राRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील