जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोरसेनेचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:31 IST2021-01-22T04:31:21+5:302021-01-22T04:31:21+5:30

कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण भारतात गोरसेनेच्या वतीने ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. ...

Gorsena's fast in front of the Collector's office | जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोरसेनेचे उपोषण

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोरसेनेचे उपोषण

कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण भारतात गोरसेनेच्या वतीने ठिकठिकाणी साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने २१ जानेवारी रोजी गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण व अमरावती विभागीय अध्यक्ष रामचंद (सोनू) चव्हाण यांच्या नेतृत्वात शेतकरी आंदोलनाला समर्थन म्हणून २१ ते २५ जानेवारीपर्यंत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडण्यात आल्या. दिल्ली येथे कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून, या शेतकरी आंदोलनात जवळपास ८० शेतकरी शहीद झाले आहेत. या कायद्यासंदर्भात सरकारसोबत अनेक वेळा चर्चा, बैठका होऊनसुद्धा कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ संपूर्ण भारतात गोरसेनेच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात साखळी उपोषणाला बसल्याची माहिती यावेळी उपोषणकर्त्यांनी दिली. या उपोषणात गोरसेना शहर अध्यक्ष रमेश पवार, विलास चव्हाण, स्वप्निल चव्हाण, आकाश राठोड, विशाल जाधव, अजय चव्हाण, विशाल राठोड, अजय चव्हाण, विशाल चव्हाण, ओम राठोड, अक्षय राठोड, मयूर राठोड, पवन राठोड, लक्ष्मण पवार, मुकेश चव्हाण, सुभाष मिसाळ, सोपान चव्हाण, सुरेश राठोड, गजानन राठोड, संदीप पवार यांच्यासह गोरसेनेच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

Web Title: Gorsena's fast in front of the Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.