भाजपचे अच्छे दिन.इतर पक्ष दीन!
By Admin | Updated: October 21, 2014 00:56 IST2014-10-21T00:56:51+5:302014-10-21T00:56:51+5:30
बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस ,भारिप-बमसंचे खाते निरंक: शिवसेनेला तोटा, काँग्रेस चिंतेत.

भाजपचे अच्छे दिन.इतर पक्ष दीन!
राजेश शेगोकार / बुलडाणा
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता पक्षीय पातळीवर निकालाचे विेषण केल्या जात आहे. बुलडाणा जिल्ह्यातील निकाल हे भाजपाला अच्छे दिन आल्याचे शिक्कामोर्तब करणारे ठरले असून, इतर पक्षाची स्थिती अतिशय ह्यदीनह्ण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागांवर विजयाची हमी असताना एकही जागा जिंकता आली नाही तर भारिप-बमसंचा अकोला पॅटर्न बुलडाण्याकडे यावेळी नक्की सरकेल, असे वाटत असताना त्याचाही मार्ग बंद झाला. सेनेची संख्या कायम राहिली असली तरी बुलडाण्यातील सेनेचा लाजीरवाणा पराभव धक्कादायक आहे अन् काँग्रेसमध्ये घरचे भेदीच काँग्रेसला बुडविताना दिसले. मनसेचे इंजिन यावेळी वाजले नाही; पण चालले खूप, त्यामुळे या पृष्ठभूमीवर आता सर्वच पक्षांना नव निर्माणाची संधी मिळाली आहे.
दोस्त अगर फेल हुऑ तो बुरा नही लगता, मगर वो मिरिट मे पास हुऑ तो जादा बुरा लगता है..हा थ्री इडियटमधील संवाद बुलडाणा व चिखलीत झालेल्या काँग्रेसच्या विजयाच्या पृष्ठभूमीवर चपखल बसत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमधील अनेकांनी विरोधाची भूमिका घेतली. पैसा नाही, दिल्लीत राहतो, संपर्क नाही, संवाद नाही, हे काय निवडून येणार, अशी चर्चा काँग्रेसवालेच करू लागले; मात्र याच आरोपांचे अस्त्र करून सपकाळ यांनी निवडणूक लढली. विचार, विश्वास व विकास हे तीन मुद्दे प्रभावी असले तरी त्यांनी कार्यकर्त्यांशी साधलेला थेट संवाद त्यांची जमेची बाजू ठरली. असाच प्रकार चिखलीत झाला. राहुल बोंद्रे यांच्याविषयी नाराजी आहे, प्रचंड रोष आहे, अशी चर्चा काँग्रेसमधूनच जाणीवपूर्वक पसरविण्यात आली होती. बोंद्रे यांनी मात्र आमदारकीच्या काळात राबविलेल्या विविध विकासाची गंगोत्री मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांनी प्रयत्न केला व त्याला यश आले. जातीपातीचे राजकारण मुळापासून उखडून काढत त्यांनी घेतलेली मते ही काँग्रेसला बळ देणारी आहेत; मात्र या दोघांच्या विजयाचे कौतुक करताना ह्यदोस्त मिरिटह्ण मध्ये आला, ही भावना काँग्रेसच्या काही नेत्यांना अजूनही आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून बुलडाण्यात डॉ.राजेंद्र शिंगणे हे या पक्षाची सर्वात दमदार ओळख आहे. कॅबिनेट मंत्रीपदापासून तर लोकसभेची उमेदवारी देण्यापर्यंत पक्षाने त्यांना ताकद दिली. त्यांच्या रूपाने गेल्या दोन दशकापासून राष्ट्रवादीला बुलडाण्यातून विधानसभेत प्रतिनिधीत्व मिळत होते; मात्र या निवडणुकीत ते उमेदवार नव्हते त्यामुळे डॉ.शिंगणे यांच्याविना झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीसुद्धा ह्यविजयाविनाचह्ण राहिली आहे. खरं तर केंद्रात व राज्यात सत्तेत राहिलेल्या पक्षासाठी ही नामुष्कीची बाब आहे. सिंदखेडराजा मतदारसंघात डॉ.शिंगणे उमेदवार असते तर कदाचीत निकाल वेगळा असता; मात्र ते उमेदवार नसले तरी राजकारणाचा दीर्घ अनुभव असलेल्या रेखाताई खेडेकर यांना उमेदवारी देऊन पक्षाने ही जागा गांभिर्याने घेतली होती. खुद्द शरद पवार यांनी सभा घेऊन ते अधोरेखीत केले होते, तरीही राष्ट्रवादीचा ह्यनिकालह्ण लागला. या मतदारसंघात ह्यशिंगणेह्ण यांच्यावर प्रेम करणारी जनता आहे, त्यामुळे ते नसतील तर मग जनता त्यांचेही ऐकत नाही, हे लोकसभेतील निकालानंतर आता विधानसभेतही स्पष्ट झाले. सिंदखेडराजानंतर चिखली ही जागा राष्ट्रवादीच्या प्रतिष्ठेची होती. काँग्रेसमधील दिग्गज नेते धृपदराव सावळे यांनी काँग्रेसचा हाथ व बुलडाण्याची साथ सोडून चिखली गाठली. नाती-गोती, मराठा कार्ड सहज तारून नेईल, ही त्यांची शक्तीस्थळे होती; मात्र तेच त्यांना घातक ठरली.