वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोथ लंपास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:41 IST2021-09-07T04:41:56+5:302021-09-07T04:41:56+5:30

स्थानिक गांधीनगर भागात राहणाऱ्या ६५ वर्षीय शशिकला रामदास लेंभे या सायंकाळच्या सुमारास शिवसेना तालुका प्रमुख कपिल खेडेकर यांच्या घरासमोर ...

Gold pot lamp around the neck of an old woman! | वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोथ लंपास!

वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोथ लंपास!

स्थानिक गांधीनगर भागात राहणाऱ्या ६५ वर्षीय शशिकला रामदास लेंभे या सायंकाळच्या सुमारास शिवसेना तालुका प्रमुख कपिल खेडेकर यांच्या घरासमोर रस्त्याने जात हाेत्या. यावेळी पाठीमागून दुचाकीने आलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने गळ्यातील सुमारे अर्धा तोळा वजनाची सोन्याची मनी असलेली पोथ हिसका देऊन तोडले घेऊन पसार झाले. दरम्यान, ही बाब कपिल खेडेकर यांच्या समजताच, त्यांनी दुचाकीस्वारांचा पाठलाग केला, परंतू त्यात त्यांना यश आले नाही. दरम्यान, खामगाव चौफुलीवर कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनीही दुचाकीस्वारांना अडविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनाही चकमा देत, चोरट्यांनी पळ काढला आहे. सदर चोरट्यांकडे चाकूसारखे धारदार शस्त्र असल्याची माहितीही खेडेकर यांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेने मानसिक धक्का बसलेल्या वृद्ध महिलेला धीर देऊन खेडेकर यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यास मदत केली. या प्रकरणी पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सपोनि अमोल बारापात्रे करीत आहेत.

..............................

Web Title: Gold pot lamp around the neck of an old woman!