बुलडाण्यातील मोहना ग्रामपंचायतची ग्रामसभा अव्वल !

By Admin | Updated: May 5, 2016 02:59 IST2016-05-05T02:59:24+5:302016-05-05T02:59:24+5:30

आदर्श ग्रामसभा पुरस्कार; राज्यातील ३३ ग्रामपंचायतींचा गौरव.

Golapanchayat Golapanchayat's Gram Sabha in Buldana! | बुलडाण्यातील मोहना ग्रामपंचायतची ग्रामसभा अव्वल !

बुलडाण्यातील मोहना ग्रामपंचायतची ग्रामसभा अव्वल !

बुलडाणा: स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्य शासनातर्फे आदर्श ग्रामसभा स्पध्रेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पध्रेचा निकाल ३ मे रोजी घोषित करण्यात आला असून, मेहकर तालुक्यातील मोहना ही ग्रामपंचायत यात अव्वल ठरली आहे. राज्यातील ३३ ग्रामसभांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
स्व.यशंतवराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यात सन २0१२ -१३ या वर्षात ग्रामसभांची स्पर्धा सुरू करण्यात आलीे. या माध्यमातून पंचायत राज व्यवस्था बळकटीकरणाचा शासनाचा प्रयत्न आहे. यामध्ये ग्रामसभेने घेतलेले विषय, आयोजनाचे औचित्य, ग्रामस्थांची उपस्थिती, ग्रामसभेत झालेली चर्चा या आधारावर मूल्यमापन केले जाते. जिल्हा परिषदांच्या माध्यमातून शासनाकडे प्रस्ताव सादर झाल्यावर आदर्श ग्रामसभेची निवड केली जाते. या स्पध्रेत राज्यातील ३३ ग्रामसभांना गौरविण्यात आले असून, मोहना ग्रामपंचायतीची ग्रामसभा अव्वल ठरली आहे. मोहनासह ३३ ग्रामपंचायतींना प्रत्येकी एक लाखाचा पुरस्कार दिला जाणार आहे.

Web Title: Golapanchayat Golapanchayat's Gram Sabha in Buldana!