बाहेरगावी जाताय? आधी घर सांभाळा!
By Admin | Updated: October 25, 2014 23:29 IST2014-10-25T23:29:40+5:302014-10-25T23:29:40+5:30
चोरट्यांचा घरफोडीचा उपद्रव.

बाहेरगावी जाताय? आधी घर सांभाळा!
खामगाव (बुलडाणा): सध्या दिवाळीच्या सुट्या सुरु असल्याने बाहेरगावी जाणार्यांची सं ख्या मोठी आहे. अशा वेळी बंद घर पाहून घरफोडी आणि चोरी करण्यासाठी गुन्हेगारांनी उ पद्रव सुरु केला आहे. गत महिनाभरात शहर व जिल्ह्यात घरफोडीच्या अनेक घटना घडल्या आहेत. या वाढत्या घटनांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविणे आवश्यक आहे, अशी शहर आणि परिसरातील जनतेची मागणी आहे. *सुट्यांमुळे चोरट्यांची ह्यचांदीह्ण सध्या शाळा व महाविद्यालयांना उन्हाळी सुट्या आहेत. त्यातच लग्नसराई जोरात असल्याने बाहेरगावी जाणार्यांचे प्रमाण वाढले आहे. कॉलनी आणि परिसरातील बंद घरांची पाहणी करून चोरट्यांकडून रात्रीच्या वेळी गुन्हेगारी उपद्रव केला जात आहे. वाढत्या तापमानामुळे उकाडा वाढला आहे. त्यातच अनेक ठिकाणी भारनियमन सुरु असल्याने गच्चीवर झो पणार्यांची संख्या बर्यापैकी आहे. ही संधी साधत चोरटे घरफोडी करुन रक्कम गायब करी त आहेत. घरफोडीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलिस ठाण्याच्या कर्मचार्यांकडून रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची गरज आहे.