अजगराला दिले जीवदान
By Admin | Updated: December 8, 2014 01:30 IST2014-12-08T01:30:05+5:302014-12-08T01:30:05+5:30
मातोळा तालुकातील सर्पमित्राची भूतदया.

अजगराला दिले जीवदान
मोताळा (बुलडाणा) : तालुक्यातील कोर्हाळा बाजार परिसरातील शेतामध्ये ६ डिसेंबर रोजी दु पारी आढळलेल्या अजगाराला सर्पमित्राने पकडून जीवदान दिले.
मोताळा तालुक्यातील कोर्हाळा बाजार येथील डॉ. भंडारी यांच्या शेतामध्ये अजगर दिसला. यामुळे मजूर घाबरले. दरम्यान, मजुरांचा आवाज ऐकून परिसरातील शेतकरी व शेतमजूर घटनास्थळी जमा झाले. दरम्यान, रोहिणखेड येथील सर्पमित्र सुरेश राजनकर यांना माहिती देण्यात आली. स र्पमित्र राजनकर मित्रासह घटनास्थळी दाखल झाले व अथक परिङ्म्रम करून अजगराला पकडण्यात यश मिळवले. पकडलेला अजगराची लांबी सुमारे ९ ते १0 फूट व वजन १२.१५ किलो असल्याचे राजनकर यांनी सांगितले.