शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम तात्काळ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:05 IST2021-03-04T05:05:25+5:302021-03-04T05:05:25+5:30
बुलडाणा : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात ...

शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम तात्काळ द्या
बुलडाणा : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम तात्काळ देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अग्रणी बँक अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
राज्य सरकारने सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजना सुरू केली होती. या कर्जमाफीमध्ये पात्र असूनही अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती सन्मान कर्जमाफी योजना राज्यात सुरु केली होती. या याेजनेच्या लाभापासूनही अनेक शेतकरी वंचित आहेत. महाविकास आघाडी सरकारने राज्यात महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना सुरू केली. या योजनेत बुलडाणा जिल्ह्यातील काही प्रमाणातील शेतकऱ्यांना योजनेचा फायदा मिळाला. परंतु, आजही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा न झाल्याने शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीची मशागत करण्यासाठी बँकेने कर्ज नाकारले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतीच्या पेरणीपासून दूर राहिले. शेतकरी कर्जमाफीची रक्कम कधी खात्यात येईल, याची वाट पाहत आहेत. परंतु, जिल्ह्यात ३० हजार शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित आहेत. यामुळे सरकारने तात्काळ कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे द्यावे, अशी मागणी स्वाभिमानीचे विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंदन यांनी बुलडाणा जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले.
अधिकाऱ्यांनी या निवेदनाची दखल घेण्यात येईल व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, असे आश्वासन दिले. यावेळी स्वाभिमानीचे शेख रफीक शेख करीम, मारोती मेढे, मेहेंद्र जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.