नाभिक समाजाला न्याय द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:35 IST2021-04-08T04:35:03+5:302021-04-08T04:35:03+5:30
बुलडाणा: कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत गत वर्षभरापासून नाभिक समाजावर आर्थिक संकट कोसळले आहे. अशातच आताही या समाजाला लॉकडाऊनचा ...

नाभिक समाजाला न्याय द्या!
बुलडाणा: कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत गत वर्षभरापासून नाभिक समाजावर आर्थिक संकट कोसळले आहे. अशातच आताही या समाजाला लॉकडाऊनचा फटका बसत आहे. शासनाने समाजाला मदत करावी, असे आवाहन शांताराम तायडे यांनी केली आहे.
----
आरटी-पीसीआर चाचण्या वाढवा
बुलडाणा: जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्येचा विस्फोट होत आहे. त्यामुळे रूग्णांचे ट्रेसिंग वाढविण््यासाठी आरटी-पीसीआर चाचण्या वाढविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुधाकर चंदनगोळे यांनी बुधवारी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.
---
शिवभोजन थाळीचे पार्सल द्यावे
बुलडाणा: कोरोनाच्या अनुषंगाने राज्य शासनाने लॉकडाऊन जारी केला आहे. तथापि, शिवभोजन थाळी पार्सल स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्य शासनाने दिलेत. मात्र, जिल्ह्यात अद्यापही याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी विनोद पाटील यांनी बुधवारी केली आहे.
---
ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यांची चाळण
मेहकर: तालुक्यात समृध्दी महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. रस्ताकामासाठी मोठ्याप्रमाणात जड वाहने दाखल होत आहे. त्यामुळे मेहकर तालुक्यातील रस्त्यांची चाळण होत असल्याने स्थानिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे.
---
अंबाशी येथे लसीकरणाला प्रतिसाद
बुलडाणा: चिखली तालुक्यातील अंबाशी येथील आरोग्य उपकेंद्रात सोमवारी १५५ जणांचे लसीकरण करण्यात आले. कोरोना लसीकरणाला ग्रामीण भागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
---
पक्ष्यांसाठी पाणेरीचा उपक्रम
बुलडाणा: तीव्र उन्हामुळे पशुपक्ष्यांची होणारी होरपळ लक्षात घेता, सृजन बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने पक्षांसाठी पाणेरीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. राजूर घाटातील झाडांवर पक्षांसाठी जलपात्र लावण्यात आले आहेत.
---
कोरोना जनजागृती मोहिमेला सुरूवात
मोताळा: शहरासह शेलापूर, माकोडी परिसरात कोरोना जनजागृती मोहिमेला सुरूवात करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाकडून कोरोना लसीकरणाचे महत्व पटवून दिले. लसीकरणासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले.
---
ग्रामीण भागात मजुरांचा तुटवडा
बुलडाणा: मजुरीचे दर वाढल्याने तसेच मजूर मिळेनासे झाल्याने शेतकºयांनी आपली शेती ठोक्या बटाईने देण्यासाठी प्रयत्न चालविले आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे शेतकºयांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.
---
आदेश मागे घेण्याची मागणी
बुलडाणा: सलून व्यवसाय बंद ठेवण्याचा आदेश मागे घेण्याची मागणी ऑल महाराष्ट्र बार्बर युनियनच्यावतीने बुधवारी करण्यात आली. यासंदर्भात संघटनेचे अध्यक्ष विजय गवळी यांनी जिल्हाधिकाºयांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
--
शासनाकडून व्यापाऱ्यांची फसवणूक
बुलडाणा: शनिवार, रविवार संचारबंदीचे कारण पुढे करीत ‘ब्रेक द चेन’च्या नावावर राज्य शासनाकडून व्यापाऱ्यांची फसवणूक करण्यात येत आहे. व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन झुगारून द्यावा, असे आवाहन अजय वानखडे यांनी केले आहे.
-