शेतकऱ्यांना न्याय द्या : उमाळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:33 IST2021-02-05T08:33:25+5:302021-02-05T08:33:25+5:30
मेहकर : कृषिप्रधान देश असलेल्या भारतातील शेतकऱ्याला जगविण्यासाठी त्याला न्याय द्यावा, असे प्रतिपादन काँग्रेस नेते श्याम उमाळकर यांनी येथे ...

शेतकऱ्यांना न्याय द्या : उमाळकर
मेहकर : कृषिप्रधान देश असलेल्या भारतातील शेतकऱ्याला जगविण्यासाठी त्याला न्याय द्यावा, असे प्रतिपादन काँग्रेस नेते श्याम उमाळकर यांनी येथे केले.
७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मेहकर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने शहराध्यक्ष कलीम खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तत्पूर्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त श्याम उमाळकर यांच्या नेतृत्वात सत्यजित अर्बनपासून स्वातंत्र्य मैदानापर्यंत रॅली काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष विलासराव चनखोरे यांनी केले. अॅड. अनंतराव वानखेडे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी भीमशक्तीचे राज्य सरचिटणीस भाई कैलास सुखधाने, काँग्रेस नेते तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुदेश लोढे, ज्येष्ठ काँग्रेस नेते दिगंबरराव मवाळ, माळी सेवा समितीचे भूषण भैया देशमुख, प्रा. विनोद पऱ्हाड, माजी नगरसेवक संजय म्हस्के, माजी नगरसेवक रवी सावजी, घनश्याम जोशी, अशोकराव इनकर, दर्शन चोपडा, गिरीश राजे उमाळकर, सुरेशभाऊ मुंदडा, बाळासाहेब सावजी, श्रीराम निकम, प्रफुल्ल पाराशर, डॉक्टर सुजित महाजन, ‘एनएसयुआय’चे प्रदेश सचिव वसीम कुरेशी, जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्षा मंगलाताई राजगुरू, शहर महिला काँग्रेस अध्यक्षा आरतीताई दीक्षित, रफिकभाई कुरेशी, युवा नेते दिलीप बोरे, वैभव उमाळकर, अॅड. गोपाल पाखरे, अॅड. सी. वाय. जाधव, अॅड. नितीन जाधव, अॅड. जनार्दन गवई, शेखर जोशी, किशोर दादा गवई, नारायण पचेरवाल, प्रा. संजय वानखेडे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष अक्षय इनकर, आशिष बापू देशमुख, रियाज कुरेशी, छोटू गवली, सोशल मीडिया शहराध्यक्ष आशुतोष तेलंग, जमील अहमद, सुखदेव ढाकरके, सार्थक दीक्षित, नारायण इंगळे, रहिम गवली, मुनाफ खान, किशोर मरकड, उमाकांत जोशी, धमार्जी बनचरे, समाधान देबाजे, शरद गिरी, शाहू गवली, सादिक बागवान यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (फोटो)