शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: बच्चू कडूंचा पक्ष शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार?, थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार
3
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
4
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
5
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
6
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
7
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
8
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
9
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
10
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
11
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
12
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
13
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
14
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
15
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
16
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
17
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
18
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
19
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
20
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर तालुक्यात मुलींचा जन्मदर घटला

By admin | Updated: April 25, 2017 00:13 IST

मलकापूर- मलकापूरमध्ये मुलींचा जन्मदर घटत असल्याची बाब गत वर्षाच्या प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट झाली आहे.

मनोज पाटील - मलकापूरमलकापूरमध्ये मुलींचा जन्मदर घटत असल्याची बाब गत वर्षाच्या प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट झाली आहे. त्यामुळे आता येथे मुलींचा जन्मदर वाढावा यादृष्टीने व्यापक स्वरूपाची चळवळ उभी करणे गरजेचे झाले आहे. मलकापुरातील आरोग्य विभागातुन प्राप्त केलेल्या माहितीनुसार १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या मागील वर्षात शासकीय रूग्णालयात २५३ मुलं तर २०५ मुली तसेच खासगी रूग्णालयांमध्ये ६९७ मुलं तर ६४८ मुली असा जन्मदर आहे.यामध्येही शासकीय रूग्णालयात ३ मुलं व २ मुली तर खासगी रूग्णालयांमध्ये ३ मुलं व २ मुली असा ५-५ बालकांचा उपजत मृत्यू झाल्याची नोंद आहे. एकंदर गत वर्षभरात मुलांचा ९५० तर मुलींचा ८५३ असा जन्मदर असून समानतेच्या दृष्टीने जन्मलेल्या बालकांमध्ये ९७ ची तफावत आहे. अर्थातच या आकडेवारीवरुन मुलींचा जन्मदर घटल्याचे स्पष्ट झाले आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती होवूनही मुलींचा जन्मदर हा घटलेलाच आहे. १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेडराजा येथे जिजाऊंचा जन्म झाला. त्यावेळी वडील लखुजीराजे जाधव यांनी हत्तीवर बसुन साखर वाटली व मुलीच्या जन्माचे स्वागत केले. असा इतिहास या जिल्ह्याला लाभलेला आहे. त्याच जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात मात्र मुलींचा जन्मदर घटला आहे. ही बाब निश्चितच खेदजनक आहे. त्यामुळे आता सामाजिकदृष्ट्या चळवळ उभी करण्याची गरज आहे. - मंगला पाटील, माजी नगराध्यक्षा