अनैतिक संबंधातून प्रेयसीचा खून

By Admin | Updated: November 29, 2014 00:07 IST2014-11-29T00:07:42+5:302014-11-29T00:07:42+5:30

डोणगाव येथील घटना, आरोपी फरार.

Girlfriend's blood in immoral relations | अनैतिक संबंधातून प्रेयसीचा खून

अनैतिक संबंधातून प्रेयसीचा खून

मेहकर (बुलडाणा) : अनैतिक प्रेम संबंधातून एका ४५ वर्षीय महिलेचा प्रियकराने धारदार शस्त्राने गळ्यावर वार करुन खून केला व प्रेत डोणगाव येथील शासकीय धान्य गोदामाच्या पाठीमागे टाकून दिले. घटना २८ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली असून, प्रकरणातील आरोपी मात्र फरार आहे.
डोणगाव येथील शासकीय धान्य गोदामाच्या पाठीमागे एका महिलेचे प्रेत असल्याची माहिती गोदाम पालक
यांनी डोणगाव पोलीस स्टेशनला दिली. त्यावरून ठाणेदार घुगे हे त्यांच्या कर्मचार्‍यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा तपास करण्यास सुरुवात केली. तेव्हा डोणगाव येथील परवीनबी (२२) हीने मृतक सलीमाबी ही तिची आई असल्याचे सांगितल्यावरून मृतक महिलेची ओळख पटली. यासंदर्भात परवीनबी हिने डोणगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यामध्ये नमूद केले आहे की, डोणगाव येथील सलीमाबी गफ्फार शाह (४५) हिचे गावातीलच शे. रियाज शे. महंमद (३२) याच्याशी अनेक दिवसांपासून अनैतिक प्रेम संबंध होते. शे.रियाज हा परवीनबीच्या घरासमोर वारंवार येत असे व शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी द्यायचा. शे.रियाज शे. महमद
याने २७ नोव्हेंबरच्या रात्री ७ वाजता सलीमाबी हिला फोन करून भेटण्यास बोलविले. तेव्हापासून सलीमाबी घरी परतलीच नाही. दरम्यान, सलीमाबी हीचा मृतदेह डोणगाव येथील शासकीय धान्य गोदामाच्या पाठीमागे मिळून आला. याप्रकरणी शे.रियाज शे. महमद याच्याविरुद्ध डोणगाव पोलिसांनी कलम ३0२ भादंविनुसार गुन्हा दाखल केला असून, आरोपी मात्र फरार आहे.

Web Title: Girlfriend's blood in immoral relations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.