वीज अंगावर पडल्याने मुलगी ठार, दोन महिला गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 19:09 IST2020-06-27T19:09:54+5:302020-06-27T19:09:59+5:30
एक ११ वषीय मुलगी ठार झाली, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

वीज अंगावर पडल्याने मुलगी ठार, दोन महिला गंभीर
मेहकर: तालुक्यातील जनुना येथील जर्मन तलाव परिसरात २७ जून रोजी दुपारी ३.३० वाजता दरम्यान वीज पडली. यात एक ११ वषीय मुलगी ठार झाली, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
मेहकर तालुक्यातील जनुना येथील जर्मन तलाव शेत शिवारात शेतात गेलेल्या महिलांवर काळाने झडप घातली. महिला शेतात असताना विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. पावसापासून वाचण्यासाठी या महिलांनी शेतात असलेल्या झोपडीचा आसरा घेतला. मात्र दुपारी ३:३० च्या सुमारास अचानक वीज पडली. यात अनोखी महादेव राठोड (११) वर्ष जागेवरच ठार झाली. तर रेखा गजानन चव्हाण (वय ३२), सुनंदा कसनदास राठोड (५५) ह्या दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी मेहकर येथे पाठविण्यात करण्यात आले. मृत बालिका ही तिच्या मामाच्या घरी आली होती. (प्रतिनिधी)