बसखाली चिरडून बालिका ठार

By Admin | Updated: May 20, 2014 00:40 IST2014-05-19T23:57:10+5:302014-05-20T00:40:46+5:30

बसखाली चिरडून बालिका ठार; तर बालक गंभीर, १३ प्रवासी जखमी; जळगाव जामोद तालुक्यातील अपघात.

The girl killed in the bus and killed the girl | बसखाली चिरडून बालिका ठार

बसखाली चिरडून बालिका ठार

जळगाव जामोद : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ऑटोला मागून येणार्‍या एस.टी.बसने धडक दिली. ऑटोतील आईच्या मांडीवर असलेली चार वर्षाची बालिका खाली पडली आणि बसखाली येऊन जागीच ठार झाली. तर दोन वर्षाचा बालक गंभीर जखमी झाला. ही घटना आज १९ मे रोजी सकाळी वरवट रस्त्यावर कृषी विज्ञान केंद्राच्या जवळ घडली. सिद्धार्थ गौतम इंगळे (खेर्डा खुर्द) हा आपल्या ऑटो क्र. एम.एच.२८ टी २४१0 ने प्रवासी घेऊन वरवटकडे जात होता. कृषी विज्ञान केंद्राजवळ काही कारणाने रस्त्याच्या कडेला त्याने आपला ऑटो उभा केला असता जळगाववरुन शेगावकडे जाणार्‍या एस.टी.बस क्र. एम.एच.४0- ८६0५ ने या ऑटोला मागून जबर धडक दिली. त्यामध्ये आईच्या मांडीवर असलेली मोहिनी प्रदीप मोरखडे वय ४ रा. खेर्डा ही बालिका बाहेर फेकल्या गेली आणि ती खाली पडताच तिच्या अंगावरुन एस.टी. चे चाक गेले असता ती बालिका जागीच गतप्राण झाली. या अपघातात मृत मुलीचा लहान भाऊ रोहित (२) गंभीर जखमी झाला. तर इतर १३ प्रवाशांना मात्र किरकोळ मार लागला. याप्रकरणी ऑटोचालक याच्या तक्रारीवरुन एस.टी. चालक महेश गणेश महाले (जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवुन चालकास अटक करण्यात आली आहे.

Web Title: The girl killed in the bus and killed the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.