मुलीस पळविणार्यास दहा तासांत अटक
By Admin | Updated: March 23, 2017 02:33 IST2017-03-23T02:33:19+5:302017-03-23T02:33:19+5:30
न्यायालयाने आरोपी शे.तौफीक शे.रफीक याला २६ मार्चपर्यंंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
_ns.jpg)
मुलीस पळविणार्यास दहा तासांत अटक
अमडापूर (जि. बुलडाणा), दि. २२- एका १७ वर्षीय मुलीला फूस लावून १६ मार्च रोजी रात्री ११ वाजताच्या दरम्यान मोटारसायकलवर बसवून पळवून घेऊन जाणार्या आरोपीला दहा तासांच्या आत अटक करण्यात आली. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करुन अमडापूरचे ठाणेदार भूषण गावंडे यांनी पोलीस पथक नेमून आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी रवाना करण्यात आले होते. आरोपी शे. तौफीक शे.रफीक याने आपली मोटारसायकल क्र.एम.एच.२८ एआर १५५८ या गाडीवर १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते. शे.तौफीक याला पोहेका रामेश्वर जायभाये, पो.नाईक संजय नागवे, विक्की खरात, शेख अक्तर यांनी सुरत येथील एका वस्तीमधून ताब्यात घेऊन अटक केली आहे. या आरोपीला मदत करणारा शे.राजीक शे.कदीर यालासुद्धा अटक केली आहे. सदर आरोपींविरुद्ध कलम ३६३, ३६६ सहकलम ३७६ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल केला. न्यायालयाने आरोपी शे.तौफीक शे.रफीक याला २६ मार्चपर्यंंत पोलीस कोठडी सुनावली आहे.