दुचाकीस धडक दिल्याने बालिका गंभीर
By Admin | Updated: March 19, 2017 02:21 IST2017-03-19T02:21:55+5:302017-03-19T02:21:55+5:30
प्रकृती चिंताजनक झाल्याने उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले.

दुचाकीस धडक दिल्याने बालिका गंभीर
खामगाव, दि. १८- भरधाव क्रुझर गाडीने दुचाकीस धडक दिल्याची घटना नांदुरा मार्गावरील पिंप्री देशमुख फाट्याजवळ शनिवारी सकाळी १0 वाजता घडली. या अपघातात बालिका गंभीर जखमी झाली आहे. नांदुरा मार्गावरील सुजातपूर येथील रहिवासी गणेश काशिराम बेलोकार (वय ३५) हे त्यांची मुलगी कंचना (वय ९) व नातेवाईक शीतल आनंदा भांबेरे (वय २५) यांच्यासह दुचाकी क्र.एमएच २८-२२४७ ने नांदुरा मार्गावरून जात असताना त्याचवेळी समोरून येणार्या भरधाव क्रुझर क्र.एमएच २८-एएन 0१७७ ने दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात तिघे जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, यातील कंचना हिच्या डोक्याला मार लागल्याने तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.