युवतीने चिडीमाराला चपलेने बदडले

By Admin | Updated: May 30, 2014 23:43 IST2014-05-30T23:04:02+5:302014-05-30T23:43:37+5:30

युवतीची छेड काढणार्‍या चिडीमाराला त्या युवतीने शेगाव बसस्थानकावर चपलेने बदडले.

The girl changed the chimimara chapalee | युवतीने चिडीमाराला चपलेने बदडले

युवतीने चिडीमाराला चपलेने बदडले

शेगाव :चार दिवसांपासून युवतीचा पाठलाग करुन तिची छेड काढणार्‍या चिडीमाराला आज सदर युवतीने बसस्थानकावर चपलेने बदडले. यानंतर नागरिकांनीही या मजनुला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केल्याची घटना आज शुक्रवारी ११.३0 वा. च्या सुमारास घडली. निलेश विठ्ठल हिंगणे वय (२८) हा मागील चार दिवसांपासून गौलखेड येथील एका युवतीचा शेगावात पाठलाग करुन तिला पाहून हातवारे व टॉन्टींग करीत होता. याबाबत सदर युवतीने ही बाब आपल्या घरच्यांना सांगितल्यानंतर सापळा रचण्यात आला. आज शुक्रवारी सदर युवती ही शेगावात शिक्षणासाठी आली असता बसस्थानकात निलेश हिंगणे याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि टॉन्टींग केली. त्यानंतर युवतीने निलेशला बसस्थानकातच चपलेने झोडपले. यावेळी गर्दी झाल्याने प्रवाशांनीही आपले हात धुवून घेतले. पोलिसांनी चिडीमाराला ताब्यात घेतले.

Web Title: The girl changed the chimimara chapalee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.