मुलीस पळवून नेणा-यास अटक
By Admin | Updated: May 7, 2015 01:33 IST2015-05-07T01:08:46+5:302015-05-07T01:33:48+5:30
आरोपीस पोलीस कोठडी; जळगाव जा.येथील घटना.

मुलीस पळवून नेणा-यास अटक
जळगाव जामोद : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणार्या आरोपीस जळगाव जामोद पोलिसांनी ५ मे रोजी गुजरातमधून अटक केली. या आरोपीस ६ मे रोजी न्यायालयात हजर केले असता, त्यास ११ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जळगाव येथील विशालसिंह राजपूत या ३0 वर्षीय युवकाने आसलगाव येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. याबाबतची तक्रार मुलीच्या वडिलांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिल्यानंतर २९ एप्रिल रोजी पोलिसांनी विशालसिंग राजपूत याच्याविरुध्द कलम ३६३, ३६६ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कलम ८, अनु.जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ (१) (११) अन्वये गुन्हा दाखल केला हो ता. त्यानंतर तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी रूपाली दरेकर यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप मुपडे यांच्यासह विश्वनाथ जाधव, गणेश पाटील आणि महिला पोलीस सिमा खिल्लारे यांचे पथक ३ मे रोजी गुजरातमध्ये पाठविले असता तेथे या प्रकरणातील पिडीत मुलगी आरोपीच्या ताब्यात मिळून आली. त्या दोघांना ताब्यात घेवून ५ मे रोजी सदर पथक जळगावला दाखल झाले. तर ६ मे रोजी आरो पीस खामगाव येथील विशेष सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.