शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रसिद्धी मिळवणे हा सावजींचा धंदा’ - संतोष चनखोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 01:51 IST

मेहकर: खोटे बोलून प्रसिद्धी मिळवणे हा माजी मंत्री सुबोध सावजी यांचा जुना धंदा असल्याचा टोला माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष चनखोरे यांनी रविवारी येथे लगावला.

ठळक मुद्देमाजी जिल्हा परिषद सदस्य संतोष चनखोरे यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: खोटे बोलून प्रसिद्धी मिळवणे हा माजी मंत्री सुबोध सावजी यांचा जुना धंदा असल्याचा टोला माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष चनखोरे यांनी रविवारी येथे लगावला.बोरी येथील विहिरीमध्ये जिल्हय़ातील पाणीपुरवठा योजनांमध्ये झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी सावजींनी मध्यंतरी बैठा सत्याग्रह केला होता. २0 जानेवारी रोजी हे आंदोलन कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या आश्‍वासनानंतर स्थगित केले होते. दरम्यान, या सर्व पृष्ठभूमीवर माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष चनखोरे यांनी रविवारी मेहकर येथेल पत्रकार परिषद घेऊन उपरोक्त आरोप केला. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर, तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर, उपतालुकाप्रमुख समाधान साबळे, संचालक सुरेश काळे, सरपंच रामेश्‍वर बोरे, मेहकरचे उपनगराध्यक्ष जयचंद बाठिया उपस्थित होते. चनखोरे पुढे म्हणाले की, बोरी येथील नळ योजनेचे अंदाजपत्रक १ कोटी ९ लाख असून, २७ लाख ५४ हजारांचा पहिला हप्ता मिळाला आहे. संबंधित शेतकर्‍यांच्या दानपत्राची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली विहिरीचे व जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. याच कामाचे मूल्यांकन ३४ लाख रुपये काढण्यात आले आहे.  उर्वरित पैसा शासनाकडून मिळणे बाकी असताना १ कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांचा आरोप खोटा आहे. सुबोध सावजींनी पुरावे द्यावेत, असे प्रतिआव्हानही चनखोरेंनी दिले आहे.दरम्यान, चनखोरे यांनी, सावजी तब्बल १२ वर्षे आमदार व मंत्री होते. त्या काळात सावजींनी डोणगावचा पाणी प्रश्न सोडवला नाही. खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमुलकर यांनी डोणगाव पाणीपुरवठा योजनेसाठी ५ कोटी दिले. जे स्वत:च्या गावचा विकास करू शकले नाही ते जिल्हय़ाचा काय विकास करणार, असा खोचक प्रश्नही चनखोरेंनी उपस्थित केला. 

माझे आंदोलन हे जनहितासाठी आहे. कोणत्याही खासदार, आमदार अथवा जिल्हा परिषद, पंचायत लोकप्रतिनिधीच्या विरोधात नाही. जे अधिकारी शासनाची दिशाभूल करून निकृष्ट व चुकीची कामे करून पाणी पुरवठा योजनेच्या कामात भ्रष्टाचार करीत आहेत, त्यांच्या विरोधात माझे आंदोलन आहे.- सुबोध सावजी माजी राज्यमंत्री, मेहकर

टॅग्स :Subodh Savjiसुबोध सावजीbuldhanaबुलडाणाagitationआंदोलन