बुलडाणा : सुबोध सावजींचा विहिरीतील बैठा सत्याग्रह सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 01:02 AM2018-01-20T01:02:27+5:302018-01-20T01:02:54+5:30

डोणगाव : जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांमधील भ्रष्टाचार प्रकरणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी गुरूवारी सुरू केलेला विहीरीतील बैठका सत्याग्रह दुसर्या दिवशीही सुरूच होता. दरम्यान, जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या किती विहीरींचे दानपत्र नाही, याची तपासणी करण्याच्या आयुक्तांच्या आदेशाची जिल्हा यंत्रणेने अंमलबजावणी करावी, अशी त्यांची दुसरी मागणी त्यांनी सध्या रेटून धरली आहे.

Buldhana: Subodh Sabhini's seated satyagraha in the well! | बुलडाणा : सुबोध सावजींचा विहिरीतील बैठा सत्याग्रह सुरूच!

बुलडाणा : सुबोध सावजींचा विहिरीतील बैठा सत्याग्रह सुरूच!

googlenewsNext
ठळक मुद्देअधिकार्‍यांनी केले विहिरीचे मोजमाप

लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव : जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांमधील भ्रष्टाचार प्रकरणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी गुरूवारी सुरू केलेला विहीरीतील बैठका सत्याग्रह दुसर्या दिवशीही सुरूच होता. दरम्यान, जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या किती विहीरींचे दानपत्र नाही, याची तपासणी करण्याच्या आयुक्तांच्या आदेशाची जिल्हा यंत्रणेने अंमलबजावणी करावी, अशी त्यांची दुसरी मागणी त्यांनी सध्या रेटून धरली आहे. त्यामुळे कुठल्याही स्थितीत त्यांचा हा विहीरीतील बैठा सत्याग्रह लवकर  संपुष्टात येण्याची शक्यता तुर्तास धुसर दिसत आहे.
दुसरीकडे विहीरीत बैठा सत्याग्रह सुरू केल्याची वार्ता जिल्हा परिषद प्रशासनामध्ये पोहोचल्यानंतर मध्यरात्रीच जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता  राजपूत व त्यांच्या सहकार्यांनी बोरी गावा गाठले होते. तेथील दानपत्र नसलेल्या परंतू पाणीपुरवठा योजनेसाठी खोदलेल्या विहीरीचे मोजमाप त्यांनी रात्रीच केले. त्यानंतर शुक्रवारी दुपारी अधिकार्यांनी  योजनेवरील जलवाहीनीचे मोजमाप केले. अधिकार्यांनी सुबोध सावजी यांची भेट घेतली मात्र जोपर्यंत दोषींवर गुन्हे दाखल होत नाही तोवर आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार त्यांनी विहीरीतूनच अधिकार्यांशी संवाद साधतना बोलून दाखवला.  दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस श्याम उमाळकर, शैलेश बावस्कर, कलीम खान यांनी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला. 
यावेळी बुलडाणा जिल्हा पाणीपुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे दामुअण्णा ढोणे, लक्ष्मणराव दांदडे, आकाश जावळे, श्याम इंगळे, रहीमभाऊ , दत्ताजी शिंदे, सायली सावजी, अबरार खान, शैलेश सावजी उपस्थित होते.

स्वाभिमानीचाही पाठिंबा
या आंदोलनास स्वाभीमानी शेतकरी संघटनेनेही पाठिंबा दिला आहे. युवा नेते रविकांत तुपकर यांनी स्वाभीमानीचे जिल्हा संपर्क प्रमुख ज्ञानेश्‍वर टाले यांना घटनास्थळी पाठवून या आंदोलनाला पाठींबा जाहीर करण्याचे सांगितले होते. त्यानुषंगाने हा पाठिंबा देण्यात आला आहे. दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Buldhana: Subodh Sabhini's seated satyagraha in the well!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.