‘अर्ज घ्या - कर्ज द्या’ आंदोलन
By Admin | Updated: September 4, 2015 00:27 IST2015-09-04T00:27:25+5:302015-09-04T00:27:25+5:30
खामगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पवित्रा.

‘अर्ज घ्या - कर्ज द्या’ आंदोलन
खामगाव : सलग तिसर्या वर्षी भयंकर दुष्काळ व नापिकीचा सामना शेतकर्यांना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांना एकत्र करुन त्यांचे मनोधैर्य वाढावे व शासनाकडून न्याय मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ३ सप्टेंबर रोजी स्थानिक एसडीओ कार्यालयासमोर ह्यअर्ज द्या - कर्ज घ्याह्ण सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. नापिकीमुळे शेतकर्यांवर कर्ज थकीत झाले आहे. त्यातच यावर्षी शेतकर्यांना दुबार पेरणी करावी लागली. यामुळे शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून कुटुंबीयांच्या आजारावर उपचार, मुलांचे शिक्षण यावर खर्च कोठून करावा, या विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. त्यामुळे शेतकर्यांचे मनोधैर्य वाढून त्यांना शासनाकडून न्याय मिळावा यासाठी सदर आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान शेतकर्यांच्या सह्या घेऊन मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ता वाशिम जि.प.सदस्य गजानन अमदाबादकर, राज्य कार्यकारिणी सदस्य गिरीधर देशमुख, जिल्हाध्यक्ष कैलास फाटे, अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष मासूमशहा मस्तानशहा, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष शाम अवथळे, प्रकाश पाटील, आर.,बी.देशमुख, गजानन पटोकार, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष माधुरी संजय सातव, ज्ञानदेव कराळे, शे.युनुस शे.युसुफ, राजू नाकाडे, श्रीकृष्ण काकडे, आनंदा आटोळे, रणजीत देशमुख, संजय सातव, शे.कलंदर खान, अनिल चव्हाण, सोपान खंडारे या व इतर शेतकर्यांचा सहभाग होता. यावेळी तहसील कार्यालय परिसरात शेतकर्यांनी चांगलीच गर्दी केली.