खामगाव पालिकेची सर्वसाधारण सभा १९ नोव्हेंबरला
By Admin | Updated: November 11, 2014 23:56 IST2014-11-11T23:56:58+5:302014-11-11T23:56:58+5:30
विषयसूचीत शहर विकास आराखड्यास मान्यतेसह अन्य प्रस्तावांचा समावेश.

खामगाव पालिकेची सर्वसाधारण सभा १९ नोव्हेंबरला
खामगाव(बुलडाणा) : शहरातील विकास कामांना गती देण्याच्या दृष्टिकोनातून विविध विषयांना मंजुरी देण्यासाठी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा बुधवार, १९ नोव्हेंबर रोजी सकाळी १0 वाजता नगरपालिका सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या विषय सूचीवर शहर विकास आराखड्यास मान्यता, पालिकेतील सेवानवृत्त कर्मचार्यांना सेवानवृत्ती नंतरचे लाभ देणे, लाड कमिटीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना सफाई कामगार पदावर नियुक्ती देणे, अनुकंपा ज्येष्ठता यादीनुसार शैक्षणिक पात्रतेनुसार पात्र उमेदवारांना नोकरी देणे, कर विभागासाठी मागणी बिले-प्रिंट करण्यासंबंधी प्राप्त निविदा दर पत्रकावर विचार करून निर्णय घेणे आदींसह वेळेवर येणार्या विषयांवर चर्चा होणार आहे.