आमसभेत महिला सदस्याऐवजी त्यांच्या पतीनींच विचारले प्रश्न !
By Admin | Updated: March 27, 2017 21:45 IST2017-03-27T21:45:13+5:302017-03-27T21:45:13+5:30
पंचायत समितीच्या आमसभेत महिला सदस्याऐवजी त्यांच्या पतीनींच प्रश्न उपस्थित केल्यामुळे गोंधळ उडाला.

आमसभेत महिला सदस्याऐवजी त्यांच्या पतीनींच विचारले प्रश्न !
देऊळगावराजा, दि. २७- पंचायत समितीच्या आमसभेत महिला सदस्याऐवजी त्यांच्या पतीनींच प्रश्न उपस्थित केल्यामुळे गोंधळ उडाला. सोमवारी ही आमसभा पार पडली.
पंचायत समितीच्या प्रांगणात झालेल्या आमसभेच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर होते. सभेमध्ये सदस्यांनी विचारलेल्या गंभीर प्रश्नांवर अधिकार्यांनी थातूरमातूर उत्तरे दिली. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सिंचन विहिरी, विविध योजनेतील अनुदान, शासनाचे घरकुल योजना, शेती विषयक अवजार, बी - बियाणे, शेत रस्ते अशा सोयीसुविधा पंचायत समितीमार्फत ग्रामीण भागात राबविल्या जातात. यासंदर्भात विविध सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. या सभेला नवनिर्वाचीत महिला सदस्यांसह त्यांचे पतीही उपस्थित होते. यावेळी काही महिला सदस्यांच्या पतींनीच प्रश्न विचारल्याने आमसभेत चांगलाच गोंधळ उडाला.
- आमदारांनी घेतली हजेरी !
सभा सुरु होण्यापूर्वी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी विभागनिहाय अधिकार्यांची चांगलीच हजेरी घेतली. तक्रारी असलेल्या अधिकार्यांनाही त्यांनी चांगलेच फैलावर घेतले. आमसभेतील प्रश्नांना उत्तरे देताना अधिकार्यांच्या नाकी नऊ आले होते.