एक लाख वृक्ष लागवडीची गुरुदक्षिणा!
By Admin | Updated: July 20, 2016 00:28 IST2016-07-20T00:28:17+5:302016-07-20T00:28:17+5:30
चिखली येथील रौप्य महोत्सवी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त स्वामी हरिचैतन्य महाराजांना एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प सोडून गुरुदक्षिणा दिली.

एक लाख वृक्ष लागवडीची गुरुदक्षिणा!
चिखली (जि. बुलडाणा): गुरुपौर्णिमा हा गुरुपूजनाचा दिवस. यानिमित्ताने तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथील गुरुदेव आङ्म्रमात रौप्य महोत्सवी गुरुपौर्णिमा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळय़ात १ लाख वृक्षांची लागवड व त्यांच्या संगोपनाचा संकल्प करणार्या स्वामीभक्तांनी स्वामी हरिचैतन्य महाराजांना एक आगळीवेगळी गुरुदक्षिणा देऊन कृतज्ञता व्यक्त केली.
तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथील स्वामी हरिचैतन्य महाराजांच्या गुरुदेव आङ्म्रमात दरवर्षी गुरुपौर्णिमा उत्सव मोठय़ा उत्साहात व हजारोंच्या उपस्थितीत साजरा केल्या जातो. यंदा येथील गुरुपौर्णिमा उत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष होते. त्यानुसार हा सोहळा संस्मरणीय ठरावा, सोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यात आङ्म्रमाचे भरीव योगदान राहावे, यानुषंगाने स्वामीभक्तांनी यावेळी १ लाख वृक्ष लागवडीची गुरुदक्षिणा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार १९ जुलै रोजी गुरुदेव आङ्म्रमात आयोजित रोप्य महोत्सवी गुरुपौर्णिमा उत्सवात हजारो भक्तांनी हा संकल्प पूर्णत्वास नेण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी बोलताना हरिचैतन्य महाराजांनी वृक्ष लागवडीसोबतच त्या वृक्षाची जोपासना करणे गरजेचे असून, नुसते रोप लावून भागणार नाही तर त्या रोपट्याचे मोठय़ा वृक्षात रूपांतर होण्यापर्यंत त्याचे संगोपन प्रत्येकाने करावे व एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्णत्वास न्यावा, असे आवाहन केले. या सोहळय़ास उपस्थित तहसीलदार विजय लोखंडे, गविअ राजपूत, अरविंदबापू देशमुख, डॉ.गणेशराव कोल्हे, रवींद्र डाळींमकर, राजू पाटील, हरियाक्ष महाराज, डॉ.भास्करराव पालवे आदी मान्यवरांच्याहस्ते आङ्म्रम परिसरात १0१ वृक्षांची लागवड करून वृक्ष लागवड व संगोपनाच्या मोहिमेस सुरुवात करण्यात आली. दरम्यान, आङ्म्रमात पार पडलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवात स्वामींना गुरुस्थानी मानणार्या हजारो अनुयायांनी त्यांचे दर्शन व पूजन करून कृतज्ञता व्यक्त केली. यापश्चात हरिचैतन्य महाराजांचे प्रवचन पार पाडले. या सोहळय़ाला महिला व पुरूषांची मोठी उपस्थिती होती.