शेगाव येथे माळी समाज परिचय संमेलनाचा उत्साहात समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2016 01:49 IST2016-01-11T01:49:09+5:302016-01-11T01:49:09+5:30
२१00 युवक- युवतींनी दिले परिचय

शेगाव येथे माळी समाज परिचय संमेलनाचा उत्साहात समारोप
शेगाव (जि. बुलडाणा): येथे २२ व्या दोन दिवसीय माळी समाज राज्यस्तरीय उपवर युवक-युवती परिचय संमेलनाचा रविवारी उत्साहात समारोप झाला. संमेलनाचे अध्यक्ष सदानंद खंडारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारोप कार्यक्रमाच्या वेळी मंचकावर संत सावता महाराजांचे वंशज हभप सावता महाराज वसेकर, प्रल्हाद सातव, प्रकाश कापुरे, विठ्ठल धागे, आशा झोरे, सुशील इंगळे, शंकर क्षीरसागर, शंकर वानखडे, राजेंद्र बोचरे, शंकर क्षीरसागर, उद्धव बोळे, रामेश्वर वावगे, नामेदव बहादरे, शंकर भोपळे, डी.एस. खंडारे, नामेदव तानकर, विठ्ठल धागे, भास्कर चरखे आदींची उपस्थिती होती. दोन दिवस उत्साहात पार पडलेल्या या संमेलनात २१00 युवक-युवतींनी परिचय दिला. शेगाव येथील माळी सेवा मंडळ आणि युगपुरुष बहुउद्देशीय प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने आयोजित या समारोपीय कार्यक्रमात सायंकाळी आजीवन सदस्यत्व स्वीकारणार्या बांधवांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद शिंगाडे, प्रदीप सातव, अजय तायडे यांनी केले. आभार बंडू इंगळे यांनी मानले. या कार्यक्रमाला राज्यभरातील माळी समाजबांधवांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.