मध्यप्रदेशातून अवैध दारु आणणारी टोळी गजाआड

By Admin | Updated: August 11, 2014 00:03 IST2014-08-11T00:03:52+5:302014-08-11T00:03:52+5:30

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात अवैधरित्या विदेशी दारु विकण्याचा गोरखधंदा

The gang carrying illegal ammunition from Madhya Pradesh | मध्यप्रदेशातून अवैध दारु आणणारी टोळी गजाआड

मध्यप्रदेशातून अवैध दारु आणणारी टोळी गजाआड

खामगाव : मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात अवैधरित्या विदेशी दारु विकण्याचा गोरखधंदा करणार्‍या टोळीला काल जळगाव जामोद- पिंपळगाव काळे रस्त्यावर रंगेहात पकडून त्यांना अटक करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून ३ लाख ३१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांनी केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोउपनि नरेंद्र मावळे यांना मध्यप्रदेशातून जिल्ह्यात विदेशी दारुची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. मावळे यांनी जळगाव जामोद- पिंपळगाव काळे रस्त्यावर सापळा रचला असता पिंपळगाव काळे येथील पावर हाऊस समोरुन इंडिका क्रमांक एमएच ३0 पी २८९९ मध्ये विदेशी दारु घेऊन जाताना रंगेहात पकडले. इंडिका कारमध्ये २४ हजार २८ रुपयाचा मुद्देमाल आढळून आला. तसेच इंडीका कार असा एकूण ३ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मावळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी परमानंद ताराचंद भुजवाणी वय ५५, लालाधर साहेबराव पाटील वय ३४, राकेशकुमार चंद्रकुमार अडवाणी २५, आकाश अशोककुमार नवलाणी २१ सर्व रा. बर्‍हाणपूर यांच्या विरुद्ध कलम ६५ (क) (ड) ८३, १0८ भादंविन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता उपरोक्त चारही जणांना न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावलीे. कारवाईत पोउपनि नरेंद्र मावळे, पोकाँ. सोळंके, देशमुख, जाधव, एडसकर आदींनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी) प्रवाशांची एसटीवर झुंबड निमित्त रक्षाबंधनचे : आगाराकडून जादा बसफेर्‍यांचे नियोजन खामगाव: बहिण-भावाच्या नात्याची महती पटविणार्‍या रक्षाबंधन सणानिमित्त आज एसटी तसेच इतर प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांवर प्रवाशांची चांगलीच गर्दी होती. सकाळपासून शहरातून इतर ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांची चांगलीच धावपळ दिसून आली. खामगाव शहर हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे येथून दररोज प्रवाशांची गर्दी असते. मात्र, आज रक्षाबंधनानिमित्त प्रवाशांच्या संख्येत आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने वाढ झाली होती. भावाला राखी बांधण्यासाठी अनेक बहिणींची माहेरकडे धाव होती. त्याचप्रमाणे काही भावांचीही बहिणींकडे जाण्यासाठी ओढ असल्याने बस स्थानकावर आज नेहमीपेक्षा जास्त गर्दी दिसून आली. बस स्थानकावरील गर्दीचा ओघ लक्षात घेता काहींनी खासगी प्रवासी वाहतुकीला पसंती दिली. त्यामुळे एसटी सोबतच इतर खासगी प्रवासी वाहतुकीवरही प्रवाशांची चांगलीच गर्दी दिसून आली. वाढत्या गर्दीमुळे महामंडळासोबतच खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या काळीपिवळी, ऑटो आदी व्यावसायिकांना चांगल्यापैकी उत्पन्न मिळाले. तसेच प्रवाश्यांनाही प्रवासासाठी सुविधा झाली होती.

Web Title: The gang carrying illegal ammunition from Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.