‘जीएसटी’मुळे गणेशोत्सवाचे बजेट कोलमडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:07 IST2017-08-02T02:06:44+5:302017-08-02T02:07:05+5:30

बुलडाणा :  २५ दिवसांवर गणेशोत्सव आल्याने गणेश मंडळांकडून गणपती आगमनाची तयारी सुरू झाली आहे;   मात्र यंदा वस्तू आणि सेवाकराचा (जीएसटी) फटका गणेशोत्सव मंडळांच्या खर्चाला बसणार आहे.

Ganeshotsav budget collapses due to GST! | ‘जीएसटी’मुळे गणेशोत्सवाचे बजेट कोलमडले!

‘जीएसटी’मुळे गणेशोत्सवाचे बजेट कोलमडले!

ठळक मुद्देगणेश मूर्तीसह देखाव्यांनाही फटका देखाव्यासाठी गणेश मंडळाचा हात आखडताच

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :  २५ दिवसांवर गणेशोत्सव आल्याने गणेश मंडळांकडून गणपती आगमनाची तयारी सुरू झाली आहे;   मात्र यंदा वस्तू आणि सेवाकराचा (जीएसटी) फटका गणेशोत्सव मंडळांच्या खर्चाला बसणार आहे. बॅनर, मांडव उभारणी व देखाव्यासाठी लागणार्‍या विविध वस्तूंवर गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाची कर आकारणी जवळपास दुप्पट वाढली आहे. कच्चा मालाचे भाव वाढल्याने देखाव्याबरोबरच गणेश मूर्तीचेही भाव वाढले आहेत. 
विघ्नहर्ता o्री गणेशाची २५ ऑगस्ट रोजी स्थापना होणार आहे. मोठ-मोठे सार्वजनिक गणेश मंडळ o्री गणेशाच्या आगमनाच्या   तयारीला लागले आहेत.  जिल्ह्यात ८७४ सार्वजनिक गणेश मंडळ असून, शहरी भागात ३३७ तर ग्रामीण भागात ५३७ गणेश मंडळांचा समावेश आहे; परंतु शासनाने १ जुलैपासून देशात लागू केलेल्या वस्तू आणि सेवाकराचा म्हणजे जीएसटीचा सार्वजनिक गणेश मंडळावर बोजा पडणार आहे. उत्सवादरम्यान विविध वस्तूंच्या दरामध्ये कमी-जास्त प्रमाणात वाढ झाल्याचे दरवर्षी जाणवते; परंतु यावर्षी मांडव, सजावट खर्च, साऊंड सिस्टिम तसेच बॅनर छपाईसाठी सार्वजनिक गणेश मंडळांना जादा पैसे मोजावे लागणार आहे. गेल्यावर्षी अहवाल छपाईसाठी सहा टक्के कर द्यावा लागत होता,  तर मांडव व साऊंड सिस्टिमसाठी १५ टक्के कर द्यावा लागत होता; परंतु यावर्षी जीएसटीमुळे छपाई, विद्युत, साऊंड सिस्टिम व मांडव यासाठी १८ टक्के जीएसटी लावला आहे. परिणामी, गणेशोत्सवाच्या देखाव्यांसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. देखाव्यांसह मूर्तींंच्या किमतींनाही जीएसटीचा फटका बसला आहे. यावर्षी जीएसटीमुळे प्लास्टरचे दर १६0 रुपयांवरून २२0 रुपये झाले आहेत. 
त्यातच कच्चा मालाच्या टंचाईमुळे पारंपरिक गणेश मूर्ती करताना  मूर्तिकारांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. यंदा जीएसटीचा मोठा परिणाम गणेशोत्सवावर दिसून येत असून, कच्चा मालाच्या किमती वाढल्याने मूर्तींंच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गणेश मंडळांचे बजेटही वाढणार आहे.      
 

Web Title: Ganeshotsav budget collapses due to GST!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.