गुड मॉर्निंग पथकाची अशीही गांधीगिरी!

By Admin | Updated: July 18, 2016 02:30 IST2016-07-18T02:30:41+5:302016-07-18T02:30:41+5:30

खामगाव पालिका प्रशासनचा उपक्रम.

Gandhigiri such a Good Morning Squad! | गुड मॉर्निंग पथकाची अशीही गांधीगिरी!

गुड मॉर्निंग पथकाची अशीही गांधीगिरी!

अनिल गवई /खामगाव (जि. बुलडाणा)
नगरपालिकेकडून कार्यान्वित केलेल्या गुडमॉर्निंग पथकाने गेल्या तीन दिवसांत २१ जणांचे गुलाब पुष्प देऊन गांधीगिरीने स्वागत केले. पहाटेच शहराच्या विविध भागात जात, उघड्यावरील हगणदरी नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न पालिका प्रशासनाकडून केले जात आहेत. मात्र, ह्यगुड मॉर्निंगह्ण पथकाला अपेक्षित यश येत नसल्याचे चित्र शहराच्या विविध भागात दिसून येत आहे.
शहराच्या विविध भागात होत असलेल्या हगणदरीमुळे स्वच्छ भारत अभियान धोक्यात येत असल्याचे निदर्शनास येताच, मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांनी मागील सोमवारपासून ह्यगुड मॉर्निंगह्ण पथक कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. शहरातील शंकरनगर, चांदमारी, हिरानगर, समन्वयनगर, बाळापूर फैल, लक्कडगंज, रेखा प्लॉट, सती प्लॉट बर्डे प्लॉट, म्हाडा क्वॉर्टर, शाळा क्रमांक २ आणि ३, राजीव गांधीनगर, गोपाळनगर, बोरीपुरा आदी भागात पहाटे आणि सायंकाळच्या वेळेत पाहणी करण्यात आली. यामध्ये शहराच्या विविध भागात उघड्यावर नैसर्गिक विधीसाठी जात असलेल्या २१ जणांना गुलाबपुष्प देत, उपरोधिक स्वागत करण्यात आले. या पथकामध्ये आरोग्य निरीक्षक अनंत निळे, एस.पी. राजपूत, कैलास धेंदूडे, अशोक मावळे, पंचभूते, सुदाम भोपळे, तायडे, एस.आर. तंबोले, एस.एस. खेडकर, प्रशांत आनंदे, डी.आर. राठोड, के.के. इंगळे यांचा समावेश आहे.

Web Title: Gandhigiri such a Good Morning Squad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.