शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

विना नंबरप्लेटच्या वाहनांवर खामगाव पोलिसांची ‘गांधीगिरी’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 13:40 IST

खामगाव:  विना नंबरप्लेटचे वाहन चालविणाऱ्या अनेक वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी बुधवारी शहर पोलिसांनी अभियान राबविले.

ठळक मुद्देशहर पोलिसांनी बुधवारी आपला मोर्चा विना नंबरप्लेटच्या दुचाकी-चारचाकी वाहनधारकांकडे वळविला. दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत तब्बल २३ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. या गाड्या शहर पोलिस स्टेशनमध्ये लावून त्यांच्यावर पेंटरकडून नंबर टाकण्यात आले.

खामगाव:  विना नंबरप्लेटचे वाहन चालविणाऱ्या अनेक वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी बुधवारी शहर पोलिसांनी अभियान राबविले. पहाटेपासून विना नंबरप्लेटच्या गाड्या पकडण्यात आल्या. या गाड्या शहर पोलिस स्टेशनमध्ये लावून त्यांच्यावर पेंटरकडून नंबर टाकण्यात आले. सोबतच या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलिसाच्या या गांधीगिरी अभियानामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

खामगाव शहरातील बेशिस्त वाहतुकीला लगाम घातल्यानंतर शहर पोलिसांनी बुधवारी आपला मोर्चा विना नंबरप्लेटच्या दुचाकी-चारचाकी वाहनधारकांकडे वळविला. शहर पोलिस आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मुख्य रस्त्यावर तसेच विविध चौकातून विना नंबर प्लेटची अनेक वाहने ताब्यात घेतली. ही वाहने पोलिस स्टेशनमध्ये लावण्यात आली. वाहन खरेदी करून तीन-चार महिने उलटल्यानंतरही वाहनावर नंबर न टाकणाºया वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत तब्बल २३ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. पोलिस अधीक्षक शशीकुमार मिना, अप्पर पोलिस अधीक्षक श्याम घुगे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक संतोष टाले यांच्या पथकाने ही कारवाई केली. यामध्ये वाहतूक शाखेचे एएसआय अरविंद राऊत, मार्गरेट हंस, योगेश चोपडे, संजय इंगळे, हागे, टेकाळे, नागरे यांनी ही कारवाई केली.

फॅन्सी नंबरप्लेटवालेही रडारवर!विना नंबर प्लेट वाहन धारकांसोबतच वाहनांवर आकर्षक नंबर टाकणारे वाहन धारकही पोलिसांच्या रडारवर असल्याचे समजते. बुधवारी विना नंबरप्लेटची मोहिम राबविल्यानंतर गुरूवारी फॅन्सी नंबरप्लेट धारकांविरोधात मोहिम उघडण्यात येणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, विना नंबर प्लेटची कारवाई करण्यात आलेल्या वाहन धारकाने वाहनावरील नंबर खाडाखोड अथवा मिटविल्याचे आढळून आल्यास त्याचेवर मोटार वाहन कायद्यानुसार कलम २३६/१७७ अन्वये दोन हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे बेशिस्त आणि नियम मोडणाºया वाहन चालकांमध्ये दहशत पसरली आहे.

वाहनांवर नंबर न टाकणाऱ्या तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात दंडात्मक कारवाई केली जात आहे. शहर पोलिस स्टेशनमध्ये विना नंबर प्लेटची वाहने लावण्यात येत आहे. या वाहनांवर वाहनचालकांना नंबर टाकून दिल्या जात आहे. हा नंबर मिटविल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे.

- संतोष टाले, पोलिस निरिक्षक, शहर पोलिस स्टेशन , खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावtraffic policeवाहतूक पोलीस