जुगारावर छापा; १८ जणांना अटक
By Admin | Updated: October 14, 2015 00:29 IST2015-10-14T00:29:20+5:302015-10-14T00:29:20+5:30
नांदुरा येथे पोलीसांचे छापे ; सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त.
_ns.jpg)
जुगारावर छापा; १८ जणांना अटक
खामगाव /नांदुरा (जि. बुलडाणा): : येथील सहाय्यक जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या पथकाने नांदुरा शहरात पैशाच्या हारजीतवर सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकून १८ जणांना अटक करीत या कारवाईदरम्यान त्यांच्याकडून एक लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी ही कारवाई १२ ऑक्टोबरला सायंकाळी केली. नांदुरा-मलकापूर मार्गावरील तिरुपती हॉटेलमध्ये एक्का बादशहा नावाचा जुगार पैशावर खेळला जात असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक यशंवत सोळंके यांना मिळाली होती. त्या आधारावर पोलिसांच्या पथकाने दुपारी चार वाजेच्या सुमारास तेथे छापा टाकून १८ जणांना घटनास्थळावरच ताब्यात घेतले. यावेळी देवेंद्र प्रेमचंद राका, दिनेश भिकाजी वानखडे, पुंडलीक महिपत वानखडे, ज्ञानेश्वर राखोंडे, अनंता इंगळे, गजानन शेगोकार, नंदकिशोर मोहनलाल चांडक, दिलीप मात्रे, सोपान मेसरे, लक्ष्मी बुरुकले, शेख इब्राहीम शेख करीम, रामेश्वर असलकर, शिवाजी गुणवंतराव काटे, प्रमोद इंगळे, विक्री ओवाळकर, महादेव डवंगे, नरेश राठी, यांचा यामध्ये समावेश आहे. हे सर्व आरोपी, नांदुरा, खामगाव शहर परिसरातील आहेत. या आरोपीकडून पोलिसांनी नगदी २२ हजार ७0 रुपये तथा जुगाराचे साहित्य सहा हजार ९00 रुपुये तथा चार दुचाकींसह एकुण एक लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उपरोक्त १८ आरोपीविरोधात सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर राजपूत यांच्या तक्रारीवरून मुंबई जुगार कायद्यानुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये पोलिस हेडकॉन्स्टेबल गुलाबराव काळे, गजानन बोरसे, संदीप टाकसाळ, गणेश शेळके, अजीस परसूवाले यांच्यासह अन्य पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.