जवळा ग्रामपंचायत कार्यालयात रंगला जुगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:05 IST2021-03-04T05:05:19+5:302021-03-04T05:05:19+5:30

डाेणगाव : ग्रामपंचायत कार्यालयात जुगार रंगत असल्याची तक्रार किशोर वामन मोरे यांनी डाेणगाव पाेलिसात केली आहे. मात्र, पाेलिसांनी त्यावर ...

Gambling at the nearby Gram Panchayat office | जवळा ग्रामपंचायत कार्यालयात रंगला जुगार

जवळा ग्रामपंचायत कार्यालयात रंगला जुगार

डाेणगाव : ग्रामपंचायत कार्यालयात जुगार रंगत असल्याची तक्रार किशोर वामन मोरे यांनी डाेणगाव पाेलिसात केली आहे. मात्र, पाेलिसांनी त्यावर कुठलीही कारवाई केली नाही.

डोणगांवपासून जवळच असलेल्या ग्राम जवळा बु. येथील ग्रामपंचायत कार्यालयात काही लोक जुगार खेळत असल्याचे किशोर वामन मोरे यांना दिसले. तेव्हा ते व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याची चित्रफीत काढली. मात्र, डोणगांव पोलीस स्थानकाने याबाबत कोणतीच दखल न घेतल्याने फिर्यादीस मेहकर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यास गाठावे लागले. त्यांना लेखी निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जवळा येथे जुगार खेळत असल्याचा फोन आल्यावर आमची टीम तेथे गेली. मात्र, ग्रामपंचायत कार्यालयात त्यांना कोणीही जुगार खेळताना आढळून आले नाही. मी स्वत: पोलीस स्थानकात हजर असतांना संबंधित व्यक्ती पाेलीस ठाण्यात आली. त्यांना तक्रार देण्यास सांगितले असता ते तक्रार न देताच निघून गेल्याचे ठाणेदार दीपक पवार यांनी सांगितले.

Web Title: Gambling at the nearby Gram Panchayat office