गजानन महाराज मंदिरासमोरील जागा पार्किंगसाठी मोकळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2017 13:51 IST2017-05-08T13:51:58+5:302017-05-08T13:51:58+5:30
श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरातील मातंगपुरीचे पुनर्वसन करण्यात आले आहे.

गजानन महाराज मंदिरासमोरील जागा पार्किंगसाठी मोकळी
शेगाव : शेगाव तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत शासन निर्णयान्वये येथील श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरातील मातंगपुरीचे पुनर्वसन करण्यात आले आहे. तसेच या भागातील विस्थापितांसाठी शहरातील व्यंकटेश नगर परिसरात म्हाडाच्यावतीने सदनिका बांधण्यात आल्या आहेत. दरम्यान संत गजानन महाराज मंदिर परिसरातील अतिक्रमण हटविण्याचे आदेश न्यायालयाने सुध्दा दिले आहेत. या अनुषंगाने ५ मे रोजी मातंगपुरीतील विस्थापितांना म्हाडा सदनिकांचे प्रमाणपत्र नगराध्यक्ष शकुंतला बूच यांच्या हस्ते करण्यात आले. मातंगपुरीतील १७६ लाभार्थी या सदनिकांसाठी पात्र ठरले आहेत. तर एकूण १८६ सदनिका या भागात बांधण्यात आल्या आहेत. मंदिर परिसरातील मातंगपुरीचे विस्थापन झाल्याने श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरातील वाहन पार्किंंगचा प्रश्न सुटणार असून यामुळे भाविकांना सोयीचे होणार आहे.