मेहकर : तालुक्यातील ३९ गावपुढाऱ्यांचे भाविष्य १५ जानेवारीला इव्हीएम बंद झाले आहे. काही मतदान केंद्रांवर इव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला हाेता. पर्यायी व्यवस्था केल्यानंतर तेथे मतदान सुरळीत पार पडले.
तालुक्यातील ३९ गावांतील ३१३ जागांसाठी ७४९ उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भविष्य शुक्रवारी मतदारांनी मतदान रूपाने मशीनमध्ये बंद केले आहे. मेहकर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक २०२१ मध्ये ४१ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली. यात दोन गावांची निवडणूक अविराेध झाली, तर काही गावातील सदस्य हे अविराेध निवडून आले. याची संख्या ५३ असून, इतर ३९ गावांतील ३१३ जागांसाठी ७४९ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी निवडणूक विभागसुद्धा सज्ज असून, निवडणूक विभागाने आपली तयारी पूर्ण केलेली होती.
मेहकर तालुक्यात ४१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकरिता १५ जानेवारीला मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. या ४१ ग्रामपंचायतीमधील मोहना बु व लावणा ह्या दोन ग्रामपंचायत सोबत इतर गावांतील ५३ सदस्य बिनविरोध निवडून आले. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याठी १४२ पोलिंग पार्ट्यानी आपली जबाबदारी पार पाडली. या पोलिंग पार्ट्याना कर्ततव्यावर पोहोचविण्यासाठी व तिथून परत आणण्यासाठी १८ बसेस व ज्या दुर्गम भागात बस पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी पोलिंग पार्ट्याना पोहोचविण्यासाठी चारचाकी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.
१८ जानेवारीला निकाल
या निवडणूक प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली हाेती. तसेच भरारी पथक, पोलीस विभाग असे सर्व विभाग निवडणुकीसाठी सज्ज होते. १८ जानेवारीला निकाल जाहीर करण्यात येणार आहे.