शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा
3
काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर
4
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 
5
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
6
"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
7
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
8
तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'
9
‘एआय’ ऐक ना रे माझं, तूच मला समजू शकतोस... खरंच एआय समजून घेतं का?
10
लेख : चिंब पावसानं रान औंदा होणार आबादानी!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
12
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
13
स्क्रीनच्या पलीकडची सुट्टी; पालक म्हणून मुलांसाठी तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करू शकता
14
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
15
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
16
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
17
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
18
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
19
मोबाइल सिग्नल वृद्धीसाठी मुंबई मेट्रोच्या आयबीएस सेवेचे दर दूरसंचार कंपन्यांना अमान्य

जिगाव प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी निधीची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 12:12 IST

दहा भूसंपादन प्रकरणांची मुदत संपत असून त्यांचा निपटारा करण्यासाठी ४२२ कोटी रुपयंची गरज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना संसर्गामुळे वैद्यकीय क्षेत्रासह अत्यावश्यक सेवेसाठीच निधी उपलब्ध करण्याच्या शासनाच्या धोरणामुळे जिगाव प्रकल्पाच्या निधीला कात्री लागली असतानाच दहा भूसंपादन प्रकरणांची मुदत संपत असून त्यांचा निपटारा करण्यासाठी ४२२ कोटी रुपयंची गरज आहे.दरम्यान, या प्रकरणांपैकी केवळ दोन प्रकरणांना एक वर्षाची मुदतवाढ मिळू शकते. त्यामुळे अन्य प्रकरणे वेळत निकाली काढणे गरजेचे आहे, अन्यथा भूसंपादनाची संपूर्ण प्रक्रिया नव्याने करावी लागेल आणि त्यात जवळपास दोन वर्षे निघून जातील आणि प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण होण्यास अधिक विलंब लागण्याची शक्यता आहे.गेल्या वर्षीपासून जिगाव प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रकरणे ऐरणीवर आली होती. मार्च अखरे एक हजार १८२ कोटी रुपायंची प्रकरणे मार्गी लावण्याचे आव्हान प्रशासनासमोर होते. दरमान एक आॅगस्ट २०१६ च्या नोटीफिकेशननुसार काही भूसंपादन प्रकरणात ३० टक्के रंक्कम देवून ही प्रकरणे मार्गी लावण्यात आली होती. मात्र सप्टेंबर अखेर अनेक भूसंपादन प्रकरणात प्रारुप निवाडा करावा लागणार आहे. त्यासाठी निधीची गरज पडणार आहे. त्यामुळे ही प्रकरणे कुठल्याही स्थितीत मार्गी लावणे गरजेचे झाले आहे. मधल्या काळात तीन महिने मुदत वाढ काही प्रकरणांना घेण्यात आली होती. मात्र आता ही मुदतही संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिगाव भूसंपादनाची प्रकरणे त्वरेने मार्गी लावणे काळाची गरज बनली आहे.चार प्रकरणातच द्यावे लागणार १०२ कोटीजिगाव प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाच्या चार प्रकरणांमध्येच १०२ कोटी रुपये मोबदला द्यावा लागणार आहे. ५९० हेक्टर जमीन संपादीत करण्यासाठी हा मोबदला द्यावा लागणार आहे. त्याची १०० टक्के तरतूद सध्या प्रशासनाकडे आहे. त्यामुळे काही प्रमाणात यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. सध्या २८० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असून त्यातून ही गरज भागवली जावू शकते. मात्र त्यानंतरच्या प्रकरणांसाठी निधीची अवश्यकता पडणार आहे. ही समस्या प्रशासनासमेर आहे.प्रशासकीय पातळीव तोडग्यासाठी लवकरच बैठकभूसंपादन प्रकरणे आणि कलम ‘ड’ च्या संदर्भाने अनेक प्रकरणात शेतकऱ्यांचे काही आक्षेप आहेत. यासंदर्भात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीत लवकरच एक बैठक घेण्याचा निर्णय १८ जून रोजी घेण्यात आला आहे. या बैठकीस माजी मंत्री तथा विद्यमान आ. डॉ. संजय कुटे, जिल्हाधिकारी व जिगाव प्रकल्पचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. या बैठकीत भूसंपदान प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी कोणती पावले उचलता येतील निधीच्या उपलब्धतेबाबतही सविस्तर चर्चा होण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली. कोरोना संसर्गामुळे जिगाव प्रकल्पाला चालू आर्थिक वर्षात मिळणाºया ६९० कोटी रुपयांना कात्री लागली असून प्रत्यक्षात २२७ कोटी रुपयेच मिळणार आहे.

१,५०० हेक्टर जमीनीचे भूसंपादन अडचणीचेनिवाडास्तरावर आलेल्या दहा भूसंपादन प्रकरणांपैकी सहा प्रकरणांमध्ये एक हजार ५०० हेक्टर जमीन संपादीत करावयाची आहे. या सहा प्रकरणांसाठीच ३२० कोटी रुपयांची गरज आहे. यातील दोन प्रकरणांना भूसंपादन कायद्यातील तरतुदींचा आधार घेवून किमान एक वर्षापर्यंत मुदत वाढ दिली जावू शकते. मात्र अन्य प्रकरणांमध्ये निधी उपलब्ध करणे आवश्यक आहे. कलम १९ मधील प्रकरणात प्रारंभी ३० टक्के निधी देण्यात आल्यानंतर प्रारुप निवाड्यात ७० टक्के रक्कम द्यावी लागते. त्यासाठी १०० टक्के निधी मिळणे गरजेचे झाले असल्याची माहिती सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प