निधिषा राज्यातून ४५ वी

By Admin | Updated: June 7, 2014 00:18 IST2014-06-07T00:16:32+5:302014-06-07T00:18:36+5:30

सीईटी परीक्षेत बुलडाणा जिल्ह्यातील मुलींची भरारी

Funding is 45 V. | निधिषा राज्यातून ४५ वी

निधिषा राज्यातून ४५ वी

बुलडाणा : महाराष्ट्र सीईटी मेडिकल प्रवेश परीक्षेमध्ये शेगावची निधिषा संजय बजाज हिने ७२0 गुणांपैकी ६१६ गुण मिळवून राज्यातून ४५ व्या क्रमांकावर उर्त्तीण झाली आहे. शेगाव येथील गजानन महाराज इंग्लिश स्कुलमध्ये शिकणारी निधिषा हिने नुकत्याच १२ वीच्या आलेल्या निकालानुसार ९५ टक्के गुण मिळवून प्रावीण्य मिळविलेले आहे. तर आज लागलेल्या महाराष्ट्र सीईटी मेडिकल प्रवेश परीक्षेमध्ये तिने ४५ वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण होण्याचा बहुमान सुध्दा मिळविलेला आहे. याबाबतीत तिचे वडिल संजय बजाज यांच्या म्हणण्यानुसार कदाचित निधिषा ही विदर्भामधून मुलींमध्ये प्रथम असू शकते. परंतु ते येणार्‍या १0 तारखेला होणार्‍या यादीवरुनच समजू शकणार. आपल्या प्रावीण्याचे श्रेय ही शिक्षकवृंद व आई-वडिलांना देते. आणि विशेष म्हणजे सध्या लाखो रुपये देवून विद्यार्थी पीईटी, सीईटीचे क्लासेस लावतात व प्रावीण्य मिळवितात. परंतु निधीशा हिने आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली घरातच सेल्फस्टडी करुन प्रावीण्य मिळविलेले आहे. आतापर्यंत या परीक्षेमध्ये एवढे गुण मिळवून प्राविण्याने उर्त्तीण होणारा एकही विद्यार्थी नाही.
**निकिता, अश्लेषाचे यश
आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण या तिन्ही व्यावसायिक अभ्याक्रमासाठी मे महिन्यात घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेत बुलडाणा येथील मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. सदरचा निकाल संकेतस्थळावर आज ऑनलाइन जाहीर उपलब्ध करुन देण्यात आला. वैद्यकीयशास्त्र सीईटीत बुलडाण्याची निकिता काशिनाथ शेळके ही राज्याच्या गुणवत्ता यादीत ओबीसी गटात ५५ क्रमांकावर झळकली. तर अश्लेषा अक्षय ढोले हीने ओबीसी गुणवत्ता यादीत ओबीसी गटात २८१ वे स्थान मिळविले. निकिता शेळके हीला पीसीबी गृपमध्ये ७२0 पैकी ५३२ गुण मिळाले. तिला फिजिक्समध्ये १0८, केमिस्ट्रीत ११९ आणि बायोलॉजीमध्ये ३0५ गुण आहे. तर अश्लेषा ढोले हीला पीसीबी गृपमध्ये ७२0 पैकी ४५२ गुण मिळाले. तिला फिजिक्समध्ये ९0, केमिस्ट्रीत १0६ आणि बायोलॉजीमध्ये २५६ गुण आहे. निकिता आणि अ‍ेषा यानी वैद्यकिय क्षेत्रात करीयर करून कुटूंबाचे स्वप्न पुर्ण करणार असल्याचे सांगितले.

Web Title: Funding is 45 V.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.