बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भटक्या विमुक्तांचा निषेध मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 02:03 PM2018-08-06T14:03:51+5:302018-08-06T14:04:54+5:30
बुलडाणा : भटक्या विमुक्तांवरील अन्यायाच्या विरोधात ६ आॅगस्ट रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.
बुलडाणा : भटक्या विमुक्तांवरील अन्यायाच्या विरोधात ६ आॅगस्ट रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. गेल्या काही वर्षांपासून देशामध्ये अराजकता निर्माण झाली आहे. भटके विमुक्तांसह बहुजन समाजावर अन्याय अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. संविधानाने दिलेले मौलिक हक्क, अधिकारी संपुष्टात आणण्याचे षडयंत्र ही व्यवस्था करीत आहे. अन्याय अत्याचाराविरोधात बहुजन भटके विमुक्त समाजाने एकीने संघर्ष केला पाहिजे यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. दुपारी गांधी भवन येथून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. प्रमुख मान्यवरांनी मार्गदर्शनपर विचार मांडले. धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथील नाथपंथी डवरी गोसावी समाजातील पाच जणांची मुले पळविणाºया टोळीच्या संशयावरुन निर्घुण हत्या करणाºयांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, जळगाव जामोद तालुक्यातील मोहिदेपूर येथील चौघांना चोरीच्या संशयावरुन नागपूर येथे ठार करणाºयांना शिक्षा झालीच पाहिजे, नारायण गाव, पुणे येथे कैकाडी समाजावर भ्याड हल्ला करुन उपजिविकेचे साधन नष्ट करणाºयांना शिक्षा झालीच पाहिजे, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील कोमल पवार या वडार जातीच्या मुलीवर अत्याचार करुन खून करणाºयांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी येथील ८१ आर जागा त्वरित देण्यात यावी, देऊळगावराजा येथील पिंपळगाव चिलमखा येथील २५ वर्षांपासून रहिवाशी असलेल्या भटके विमुक्तांना कायम भाडेतत्व, कर पावती व घरकूल देण्यात यावे, गृह चौकशी अहवालांतर्गत भटक्या विमुक्तांना जातीचा दाखला देण्यात यावा, इव्हीएम मशीन बंद करुन बॅलेट पेपरवर निवडणूका घ्याव्यात, भटक्या विमुक्तांची जाती आधारित जनगनणा करुन त्यांना संख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे, समस्त भटके विमुक्त व नाथजोगी डवरी गोसावी भराडी समाजाला अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत संरक्षण देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी कुणाल पैठणकर, समाधान कुºहाळकर, कैलास सुरडकर, नाथा शेगर, प्रशांत सोनुने, दामोद बिडवे, प्रशांत तेलंग, भगवान सावंत, नारायण शिंदे, गणेश चव्हाण, नितेश पवार, शंकर शितोळे, शिवाजी शेगर, सुभाष शेगर, वंदना पवार, शंकर शेगर, विश्वनाथ शेगर, मच्छिंद्र शेगर, माणिक शेगर, ओंकार शिंदे, उत्तम शिंदे, पंजाब चव्हाण, भानुदास पवार, विश्वनाथ शिंदे, आेंकार चव्हाण, सुनील यदमळकर, गोविंदा येदमळकर, किसन शितोळे, शंकर शितोळे, विजय मंडाळकर, रमेश शिंदे, अशोक मंडारकर, मुंगनाथ शिंदे, नाना बाबर, दिलीप जाधव, बापु शेगर, प्रकाश शेगर, रेखा जाधव, लता मोहिते, हवसाबाई मोहिते, जगदिश मोहिते यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.