शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पद्मावती चित्रपटावर बंदीसाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 01:15 IST

बुलडाणा: महाराणी पद्मावती चित्रपटाच्या निर्मात्यावर गुन्हा दाखल करून या चित्रपटावर बंदी आणावी, या मागणीसाठी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने ६ नोव्हेंबर रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देराष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: महाराणी पद्मावती चित्रपटाच्या निर्मात्यावर गुन्हा दाखल करून या चित्रपटावर बंदी आणावी, या मागणीसाठी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने ६ नोव्हेंबर रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.प्रारंभी गांधी भवन परिसरात राजपूत समाजबांधवांची सभा पार पडली. यावेळी महाराणी पद्मावती चित्रपटाच्या माध्यमातून महाराणी पद्मावती यांचा ज्वलंत इतिहास कलंकित करण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित न करता त्याच्या निर्मात्यावर गुन्हा दाखल करून चित्रपटावर बंदी आणावी, अशी मागणी करण्यात आली. चित्रपटाच्या माध्यमातून राजपूत समाजातील महिलांचे चरित्र हनन करण्याचा प्रयत्न होत आहे, ते कदापि खपवून घेणार नाही, असे राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला प्रदेश अध्यक्ष संध्या राजपूत यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात कुठल्याही चित्रपटगृहामध्ये हा  चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी दिली.  राष्ट्रीय महासचिव आनंदसिंग ठोके  यांनी यावेळी मार्गदर्शन केले. वेळेप्रसंगी तुरुंगात जाण्याची आमची तयारी असल्याची संजय नाईक यांनी स्पष्ट केले. चित्रपट बंद पाडण्यासाठी राजपूत समाजासोबत असल्याचे   जयश्री शेळके यांनी सांगितले. डॉ. प्रतापसिंग राजपूत, विजयसिंग राजपूत, मुख्त्यारसिंग राजपूत, पृथ्वीराज राजपूत, ईश्‍वरसिंग चंदेल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Padmavatiपद्मावतीagitationआंदोलन