शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

देवदूत म्हणून मित्र आले धावून, आजारी मित्रासाठी जमा केले ३० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 11:40 IST

Buldhana News : ही कहाणी आहे बुलडाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या भाईदास माळी यांची.

-  विठ्ठल देशमुखराहेरी  : कोरोनाच्या संकटकाळात रक्ताचे नातेवाईकही जवळ येत नाहीत. पण दोनदा कोरोना होऊन गेलेल्या व म्युकरमायकोसिस आजाराने ग्रस्त असलेल्या आपल्या पोलीस मित्रासाठी त्यांच्या ११३ क्रमांकाच्या बॅचमधील पोलीस अधिकाऱ्यांनी तब्बल ३० लाख रुपये जमा करून आपल्या सहकारी मित्राचा उत्तम उपचार करत त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.ही कहाणी आहे बुलडाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या भाईदास माळी यांची. मूळचे ते धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहेत; मात्र किनगाव राजा येथील पोलीस ठाण्यात ते कर्तव्यावर होते. या दरम्यान त्यांना मधल्या काळात कोरोनाचा दोनदा संसर्ग झाला. त्यातून ते बरेही झाले. पण दुर्मिळ अशा बुरशीजन्य आजारामुळे त्यांना ग्रासले होते. त्याच्या उपचारासाठी ते रुग्णालयात गेले असता तब्बल ३५ ते ४० लाख रुपयांचा खर्च त्यांना येणार असल्याचे समजले तेव्हा त्यांचे अख्खे कुटुंब हादरले. एवढ्या पैशाचा मेळ जमवायचा कसा असा प्रश्न त्यांना पडला. आणि त्यांच्या मदतीसाठी धावले ते त्यांच्या ११३ क्रमांकाच्या सिंहस्थ बॅचचे सर्व पोलीस अधिकारी. म्हणता म्हणता पैसे गोळा झाले आणि भाईदास माळी यांच्यावर मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले. आज त्यांची प्रकृती स्थिर आहे. मित्रांनी एकत्र येऊन आपल्या जिवलग मित्राला वाचविल्याचे हे एक अनोखे उदाहरण म्हणावे लागेल. २०१५-१६ मध्ये पोलीस उपनिरीक्षकपदी निवड होण्यापूर्वी ज्या अभ्यासिकेत ते अभ्यास करायचे तेथील सहकाऱ्यांनीही त्यांना मदत केल्याचे त्यांचे बंधू दीपक माळी यांनी सांगितले.दोनदा झालेल्या कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांना काही दिवसांनी म्युकरमायकोसिसचा त्रास होऊ लागला. नाक आणि तोंडाला मोठा त्रास होत होता. मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र खर्चामुळे उपचाराच्या अडचणी समोर आल्या तेव्हा मित्रांनी मदत केली. त्यावेळी त्यांच्या बॅचचे पोलीस सहकारी मदतीसाठी धावून आले असे भाईदास माळी यांचे मित्र विजय गिते यांनी सांगितले. सहकारी मित्रांना याची माहिती मिळताच दोन ते तीन दिवसात ३० लाख रुपयांचा निधी गोळा झाला आणि उपचारही सुकर झाले.बुलडाणा पोलिसांनीही केली मदतबुलडाणा पोलीस दलातील सहकाऱ्यांनी सुमारे ९० हजार रुपयांची मदत आपल्या सहकाऱ्यासाठी केली. जिल्हा पोलीस अधीक्षकापासून ते पोलीस हेडकॉन्स्टेबल पर्यंतच्या सहकाऱ्यांनी ही मदत केल्याचे किनगाव राजाचे ठाणेदार सोमनाथ पवार यांनी सांगितले. किनगाव राजा, राहेरी बुद्रुक, दुसरबीड, चांगेफळ, सोनोशी, वर्दडी, रुम्हणा येथील ग्रामस्थांनीही उपचारासाठी मदत केली आहे.

भाईदास माळी यांच्या इलाजासाठी तथा शस्त्रक्रियेसाठी जवळपास ३२ लाख रुपयांचा खर्च आलेला आहे. त्यांच्यावरील शस्त्रक्रियाही यशस्वी झाली आहे. आणखी २० दिवस त्यांना रुग्णालयात थांबावे लागेल. त्यानंतर सुटी होईल. सुटी झाली तरी किमान तीन महिने त्यांना घरी आराम करावा लागणार आहे.दीपक माळी,  भाईदास माळी यांचे बंधू

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसbuldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या