सभापती पती व पं.स.सदस्यात ‘फ्री-स्टाइल’
By Admin | Updated: June 29, 2016 00:22 IST2016-06-29T00:22:14+5:302016-06-29T00:22:14+5:30
खुर्ची नाट्याचे पडसाद चिखली पंचायत समितीमध्ये पडले असून पदाधिका-यांमध्ये मारहाण झाली.

सभापती पती व पं.स.सदस्यात ‘फ्री-स्टाइल’
चिखली (जि. बुलडाणा): पंचायत समितीमध्ये सत्ताधारी काँग्रेसच्या सदस्यांमध्ये असलेली अंतर्गत गटबाजी व खुर्ची नाट्यावरून धुमसत असलेला असंतोष २८ जून रोजी उपसभापतीपदाच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा उफाळून आला. १२ पं.स.सदस्यांच्या सभापती विरोधात घेण्यात आलेल्या सहय़ांची भनक सभापती पतीला लागल्याने पूर्वीचा धुमसत असलेला राग अनावर होऊन नवनिर्वाचित उपसभापतीच्या दालनातच सभापती पती व पं.स.सदस्यामध्ये जोरदार फ्री-स्टाइल झाल्याने पं.स.वतरुळात हा विषय चांगलाच चर्चेचा ठरला आहे.
यासंदर्भात सविस्तर असे की, चिखली पंचायत समितीमध्ये सभापती पदाच्या राजीनाम्यावरून बर्याच दिवसांपासून काँग्रेस अंतर्गत सुरू असलेली धुसफूस २३ जून रोजीच्या मासिक सभेच्या निमित्ताने चव्हाट्यावर आली होती.
त्यावेळी सभापतींप्रमाणेच सदस्यांनाही व्हील चेअर द्या, अशी मागणी करत खुर्चीच्या आडून थेट सभापतींच्या राजीनाम्यासाठी धुमसत असलेला असंतोष सदस्यांनी सभापतीच्या दालनातील खुर्ची पं.स.सदस्य भानुदास घुबे व लक्ष्मण आंभोरे यांनी बाहेर फेकून देत व्यक्त केला होता.