राष्ट्रीय समस्यासाठी मोफत बूट पॉलिश
By Admin | Updated: April 23, 2017 01:00 IST2017-04-23T01:00:00+5:302017-04-23T01:00:00+5:30
दिव्यांग असलेल्या संवेदनशील मनाचा पुढाकार

राष्ट्रीय समस्यासाठी मोफत बूट पॉलिश
सर्जेराव देशमुख
धाड: स्वत: बसस्थानकावर पादत्राणे दुरुस्तीचे काम करून उपजीविका करणार्या; मात्र राष्ट्रीय समस्यांची जाण असलेल्या धाड येथील एका दिव्यांग व्यक्तीने चक्क मोफत वर्षभर बूट पॉलिश आणि पादत्राणे दुरुस्त करून देण्याचा संकल्प केला आहे.
धाड येथील रहिवासी असलेल्या आणि धाड बसस्थानकावर पादत्राणे दुरुस्तीचे काम करणारे शिवाजी भिकाजी परमेश्वर स्वत: दोन्ही पायाने अपंग आहेत कुबड्या घेतल्याशिवाय चालू शकत नाहीत.
ह्यबेटी बचाओ आणि स्वच्छता अभियानह्ण हय़ा राष्ट्रीय समस्या असून, शासकीय पातळीवर समस्या निवारण्यासाठी प्रयत्न होत आहेत; मात्र हय़ा प्रश्नांची जाणीव असणारे संवेदनशील मनाचे शिवाजी परमेश्वर यांनी धाड बसस्थानकावर फलक लावून १ फेब्रुवारी २0१७ नंतर मुलगी असलेल्या पालकांना वर्षभर मोफत बूट पॉलिश आणि पादत्राणे दुरुस्त करून देण्याचे जाहीर केले.
त्याचप्रमाणे धाड परिसरातील गावांमध्ये १ फेब्रुवारी २0१७ नंतर शौचालय बांधकामाचे काम पूर्णत्वाचे गटविकास अधिकार्याचे प्रमाणपत्र आणल्यास अशांनासुद्धा मोफत सेवा देण्याचा त्यांचा संकल्प आहे. शिवाजी परमेश्वर यांच्या अभिनव कल्पनेची समाजातून चर्चा होत असून, त्यांना सहानुभूती मिळत आहे.