फुकटच्या ॲपमुळे शाळांची डोकेदुखी, ऑनलाइन वर्गात नको ते मेसेज व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:39 IST2021-08-25T04:39:23+5:302021-08-25T04:39:23+5:30
असेही घडू शकते... बुलडाणा शहरातील एका शाळेतील ऑनलाइन वर्ग सुरू असताना बाहेरच्या मुलांने त्या ऑनलाइन वर्गाची लिंक कनेक्ट केली. ...

फुकटच्या ॲपमुळे शाळांची डोकेदुखी, ऑनलाइन वर्गात नको ते मेसेज व्हायरल
असेही घडू शकते...
बुलडाणा शहरातील एका शाळेतील ऑनलाइन वर्ग सुरू असताना बाहेरच्या मुलांने त्या ऑनलाइन वर्गाची लिंक कनेक्ट केली. त्यानंतर, त्या मुलाने ऑनलाइन क्लासमध्येच एका मुलीला मॅसेच पाठविले. या प्रकारामुळे सर्व विद्यार्थी त्रस्त झाले असून, संबंधित पालकाने शाळेत तक्रारही केली होती.
शाळांनी ही घ्यावी काळजी...
शाळांनी त्यांच्या वर्गनिहाय अभ्यासक्रमाची लिंक ग्रुपवर शेअर करताना बाहेरील किंवा विद्यार्थ्यांचे पालक सोडून इतर कुणीही जॉइन होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. ऑनलाइन क्लास सुरू होण्याच्या पूर्वीच ग्रुपवर लिंक सेंड करावी, तसेच ऑनलाइन क्लासची लिंक इतर ठिकाणी शेअर करू नये, अशा सूचना विद्यार्थी व पालकांनाही द्यावी.
पालकांनीही दक्ष राहण्याची गरज
बऱ्याच वेळा पालक त्यांच्या कामात असताना, मुलांना ऑनलाइन क्लास जॉईन करून देतात आणि नंतर पालक त्यांची कामे करतात. अशा वेळी ऑनलाइन क्लास सोडून मोबाइलवर गेम खेळणे, कार्टून पाहणे, असे करत असल्याचेही वास्तव आहे.
विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लास घेताना शाळांनी व पालकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. शाळांनी योग्य ती लिंक शेअर करावी. ऑनलाइन क्लासची लिंक बाहेरच्या व्यक्तीला शेअर होणार नाही, याची काळजी घ्यावी. पालकांनीही ऑनलाइन क्लास सुरू असताना मुलांवर लक्ष ठेवावे. शाळेने ऑनलाइन क्लाससाठी स्वत:चे ॲप्लिकेशन तयार करावे, त्यावरूनच क्लास घ्यावे.
विलासकुमार सानप, सायबर सेल.