शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पिकअप वाहनाचा विचित्र अपघात, पती-पत्नी ठार; देऊळगाव राजा बायपासवरील घटना

By निलेश जोशी | Updated: March 18, 2023 19:04 IST

ही घटना १७ मार्च रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

देऊळगाव राजा : येथील बायपासवर पिकअप वाहनाला विचित्र अपघात होऊन देऊळगाव राजा तालुक्यातील जळ पिंपळगाव येथील पती-पत्नीचा मृत्यू झाला. ही घटना १७ मार्च रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

देऊळगाव राजा तालुक्यातील जळ पिंपळगाव येथील काकड परिवार पिकअप वाहनाने जालना येथून त्यांच्या मूळ गावी जात होता. दरम्यान, देऊळगाव राजा शहरात दाखल झाल्यावर बायपासवरून वळताना लगतच्या एका हॉटेलसमोर पिकअपची ट्रॉली घसरून मागे पडली तर वाहनाचा समोरील भाग पुढे जाऊन उलटला. या विचित्र अपघातामध्ये मागे ट्रॉलीमध्ये बसलेल्या कासाबाई भगवान काकड (४०) व त्यांचे पती भगवान भानुदासन काकड (५०) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता, कासाबाई काकड यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर गंभीर जखमी भगवान काकड यांना जालना येथे उपचारासाठी नेत असताना त्यांचा वाटेत मृत्यू झाला.

मृत पती-पत्नी हे पिकअपच्या मागील ट्रॉलीमध्ये बसले होते तर त्यांचा मुलगा समाधान हा चालकाच्या बाजूला समोर बसला होता. या विचित्र अपघाताबद्दल पोलिसांना माहिती मिळताच एपीआय डी. एम. वाघमारे पोलिस कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळी पोहोचले. यावेळी जखमी दाम्पत्याला त्यांचा मुलगा समाधान काकड याने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात हलविले होते. मात्र, नंतर दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल देवीचंद चव्हाण यांनी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी प्रारंभिक तपासाच्या आधारावर आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास देऊळगाव राजा पोलिस ठाण्यातील विनोद गवई हे करत आहेत.वर्षभरातील पाचवा अपघात -देऊळगाव राजा येथील बायपासलगत झालेला हा वर्षभरातील पाचवा अपघात आहे. यापूर्वीच्या अपघातामध्ये काहीजण किरकोळ जखमी झाले होते. दोघांना प्राण गमवावे लागले होते, असे स्थानिकांनी सांगितले. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू